कोकण

कणकवली : शेतकऱ्यांना अनुदान

CD

शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
काजू फळपीक विकास योजना; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
कणकवली, ता. १८ ः राज्य शासनाने अनुदान तत्त्वावर काजू फळपीक विकास योजना लागू केली आहे. योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी विभागातर्फे केले आहे. पत्रकात म्हटले आहे, शासनाने १६ फेब्रुवारी २०२३ ला काजूच्या सर्वंकष विकासासाठी काजू फळपीक विकास योजना लागू केली आहे. खासगी क्षेत्रातील रोपवाटिका स्थापन करणे व बळकटी करणे यासाठी किमान ५० गुंठे ते जास्तीत जास्त एक हेक्टर क्षेत्रापर्यंत कमाल अनुदान सात लाख पन्नास हजार रुपये आहे. प्लास्टिक आच्छादनाचे शेततळ्याची सुविधा निर्माण करण्यासाठी प्लास्टिकसाठी ७५ हजार रुपये अनुदान आहे. सिंचन विहिरीसाठी दोन लाख ५० हजार रुपये प्रतिविहीर अनुदान दिले जाणार आहे. काजू बागेमधील तण नियंत्रणासाठी फवारणी यंत्र, पावर विडर, ग्रास कटरसाठी अठरा हजार रुपये अनुदान आहे. जुन्या बागेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ५० टक्के व जास्तीत जास्त वीस हजार प्रति हेक्टर अनुदान दिले जाणार आहे. काजू प्रक्रिया उद्योग आधुनिकीकरणासाठी भांडवली खर्चाचा सर्वसाधारण क्षेत्र ४० टक्के कमाल दहा लाखांपर्यंत व डोंगरपाळ अधिसूचित क्षेत्रामध्ये किमान ५५ टक्के म्हणजे १३ लाख ७५ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. पॅकहाऊस व ड्रॉईंग वॉर्ड उभारणेसाठी भांडवली खर्चाच्या सर्वसाधारण पस्तीस टक्के कमाल दहा लाख पन्नास हजार व डोंगराळ अधिसूचित क्षेत्रासाठी ५० टक्के म्हणजे २५ लाखपर्यंत हे पॅक हाऊस अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा यासाठी शेतकऱ्यांनी आपला सातबारा, आठ अ, बँकेचे पासबुक, आधार कार्डसोबत जोडून ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अधिक माहिती जिल्हा किंवा तालुका कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधा, असे आवाहनही निवेदनातून केले आहे.

योजनेचे उद्दिष्ट
रोपवाटिकांची सुविधा करणे
काजू उत्पादकता वाढविणे
काजू बोंडावरील प्रक्रियेला चालना
काजू उत्पादक, प्रकल्पासाठी अर्थसाहाय्य
रोजगारनिर्मिती करणे
लागवडीपासून प्रक्रिया व मार्केटिंगविषयी मार्गदर्शन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT