कोकण

''पंचम खेमराज''चे सवंगडी 45 वर्षांनी एकत्र

CD

swt१८७.jpg
०३५१०
सावंतवाडीः स्नेहमेळाव्यासाठी एकत्र आलेले पंचम खेमराज महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी.

‘पंचम खेमराज’चे सवंगडी ४५ वर्षांनी एकत्र
सावंतवाडीत स्नेहमेळाः पाऊणशे माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ः येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील कला शाखेत १९७५ ते १९८० या काळात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा येथील पंचम खेमराज महाविद्यालयात झाला. या मेळाव्यास संस्थेचे लखमराजे भोसले, माजी प्राचार्य डॉ. द. रा. कळसुलकर, डॉ. एच. व्ही. देशपांडे, डॉ. जी. ए. बुवा, प्रा. सुभाष गोवेकर व प्राचार्य डॉ. दिलीप भारमल आदी उपस्थित होते.
मेळाव्यास मोठमोठी पदे भूषवून निवृत्त झालेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ७० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. पदवीधर होऊन बाहेर पडलेली मुले तब्बल ४५ वर्षांनी आजी-आजोबा झाल्यानंतर एकत्र येण्याचा हा योग अविस्मरणीय ठरला. शाल, श्रीफळ व गुलाब रोपे देऊन गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. प्राध्यापकांनीही विद्यार्थ्यांना भरभरून आशीर्वाद दिले. दुसऱ्या सत्रात संजय धुपकर (गोवा) यांचे गायन, सतीश शेजवलकर यांचे वादन व अन्य विद्यार्थ्यांचे गुणदर्शन झाले. मेळाव्याचे आयोजन, नियोजन व सूत्रसंचालन प्रकाश गोवेकर यांनी केले. डॉ. दिलीप भारमल यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन केले. या अपूर्व मेळाव्याची उत्तम डॉक्युमेंटरी जुईली पांगम हिने केली. प्रारंभी विकास गोवेकर यांनी सर्वांच्या आरोग्यासाठी योगाभ्यास घेतला.
सतीश लळीत, अॅड. शिवराम कांबळे, अण्णा शिरोडकर, अश्विनी उटपुरे, अमिता स्वार (वईम), मीना सामंत, मीना धडाम, शेखर पाडगावकर व जगदीश मांजरेकर आदींनी मेळाव्याच्या यशस्वीतेसंबंधी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पुढील वर्षी पुन्हा मेळावा घेण्याचा निर्धार करण्यात आला. सुनील जोशी, शबनम राजगुरू, नंदू पिळणकर, शुभांगी नार्वेकर यांनी मेळाव्यासाठी विशेष सहाय्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT