कोकण

रेल्वे आरक्षण

CD

गणेश उत्सवातील रेल्वे आरक्षण प्रतीक्षा यादीवर
कणकवली, ता. १९ ः कोकणातील गणेश उत्सवाला लाखोंनी चाकरमानी मुंबईहून येतात. कोकण रेल्वे हा प्रवासाचा प्राधान्यक्रम चाकरमान्यांकडे असतो. त्यामुळे १७ मेपासून १२० दिवसांचे आगाऊ आरक्षण सुरू झाले असले तरी पहिल्या दोन दिवसांत रेल्वेची बुकिंग हे दोनशेच्या प्रतीक्षा यादीवर पोहोचले आहे. त्यामुळे चाकरमान्यांना रेल्वेचा खडतर प्रवास करावा लागणार आहे. यंदा भाद्रपद चतुर्थी ही १९ सप्टेंबरला सुरू होत आहे. सलग अकरा दिवस चालणारा गणेश उत्सव भाविकांचे श्रद्धास्थान असते, त्यामुळे शेकडो भाविक गावाकडे येतात. घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना आणि मनोभावे सेवा केली जाते. त्यामुळे चाकरमानी गणेश उत्सवाकडे डोळे लावून असतात. कोकण रेल्वे प्रवासाचे माध्यम सुखकर माध्यम असल्याने बहुतांश चाकरमानी रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे आगाऊ आरक्षण करून गणेश उत्सवाचे नियोजन केले जाते. यंदा १७ मे रोजी १४ सप्टेंबरचे आरक्षण, १८ मे रोजी १५ सप्टेंबर आणि आज १६ सप्टेंबरचे आरक्षण सुरू झाले. मात्र, आरक्षण सकाळी आठ वाजता सुरू होताच, प्रतीक्षा यादी कमालीची वाढली होती. कोकण कन्या रेल्वे गाडीचे १६ सप्टेंबरचे आरक्षण सकाळी ११ वाजताच बंद झाले. दिवा गाडीला ३९६ ची प्रतीक्षा यादी होती. तुतारी एक्स्प्रेसचे आरक्षणही संपलेले होते. प्रतीक्षा यादीवरही तिकीट उपलब्ध नव्हते. त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. रेल्वेने १२० दिवसांची सोय आगाऊ आरक्षणाला केली असल्याने बहुतांश प्रवासी सप्टेंबरच्या नियोजनामध्ये गुंतल्याने एकाच वेळी रेल्वेच्या विविध सुविधांमधून हे रेल्वे आरक्षण बुकिंग झाले. त्यामुळे प्रतीक्षा यादी कायम आहे. ज्यांना आरक्षण मिळालेले नाही, त्यांना जादा सोडण्यात येणाऱ्या रेल्वे गाड्यांवर आरक्षणासाठी अवलंबून राहावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT