कोकण

पारितोषिकाची रक्कम बँक खात्यात जमा होणार

CD

१५ (टूडे ३ साठी)

पारितोषिकाची वाढीव रक्कम थेट बँकेत

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ः पदकप्राप्त खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांना लाभ

रत्नागिरी, ता. १९ ः गुजरात येथे झालेल्या ३६वी राष्ट्रीय क्रीडास्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व मार्गदर्शक यांना रोख पारितोषिक रक्कम देऊन गौरवण्यात आले आहे. त्या रकमेत वाढ केली आहे. ती रक्कम पदकप्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे धोरण २०१२ अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी तसेच राज्याचे नाव उज्ज्वल करून पदकप्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना रोख बक्षीस देऊन गौरवण्याची योजना संचालनालय स्तरावर कार्यान्वित आहे. त्या अंतर्गत सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत गुजरात राज्यात झालेल्या ३६वी राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत राज्याचे ३४ प्रकारात ८०० खेळाडू, व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी, मार्गदर्शक इत्यादी सहभागी झाले होते. या स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी खेळानुसार ३९ सुवर्णपदक, ३८ रौप्यपदक व ६३ कांस्यपदक असे एकूण १४० पदके प्राप्त केली असून, पदक तालिकेत देशात दुसरा क्रमांक संपादन केला आहे.
सन २०१५ या वर्षी केरळ येथे झालेल्या ३५व्या नॅशनल गेम स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकासाठी अनुक्रमे रु. ५ लाख, रु. ३ लाख व रु. १.५० लाख रोख पारितोषिक रक्कम देऊन गौरवण्यात आले आहे; परंतु या स्पर्धेतील पदकप्राप्त खेळाडूंच्या रोख पारितोषिक रक्कमेत मुख्यमंत्री महोदयांनी वाढ करून पदकप्राप्त खेळाडूंना रोख पारितोषिकाची रक्कम जाहीर केली आहे. सुवर्णपदक विजेते खेळाडू रक्कम ७ लाख व मार्गदर्शक ५० हजार, रौप्यपदक खेळाडूंना रक्कम ५ लाख व मार्गदर्शक यांना ३० हजार रुपये व कास्यपदक विजेते खेळाडू रक्कम ३ लाख व मार्गदर्शक २० हजार रु. अशी सुधारणा करण्यात आली आहे.
खेळाडू व मार्गदर्शकांच्या पारितोषिकासाठी २० कोटी ३६ लाख रु. शासनाकडून प्राप्त झाली आहे. पदकप्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली रोख पारितोषिकाची रक्कम सर्व संबंधिताच्या बँकखात्यात जमा करण्यास मंत्री क्रीडा व युवक कल्याण यांनी मान्यता दिली असून, मंजूर रोख पारितोषिकाची रक्कम संबंधिताच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही संचालनालय स्तरावर प्राधान्याने सुरू आहे, असे जिल्हा क्रीडाधिकारी रत्नागिरी यांनी कळवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT