कोकण

रत्नागिरी- कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीवर पुन्हा वहाळकर

CD

फोटो ओळी
- rat19p32.jpg- सचिन वहाळकरKOP23M03795
------------
कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार
समितीवर सचिन वहाळकर

रत्नागिरी, ता. १९ ः भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर यांची कोकण रेल्वे सल्लागार समितीवर पुन्हा निवड झाली आहे. तसे पत्र त्यांना रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झाले आहे. सचिन वहाळकर यांना या समितीवर काम करण्याचा पूर्वानुभव असून, त्यांनी कोकण रेल्वेसंदर्भातील प्रवासीवर्गाच्या अपेक्षा, मागण्या यांचा पाठपुरावा करून अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत. आता मिळालेल्या कार्यकाळात कोकण रेल्वेवरील छोट्या स्थानकांवरील समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचे वहाळकर यांनी सांगितले. रेल्वेमध्ये होणारे धोरणात्मक बदल, यातून प्रवाशांना असलेल्या अपेक्षा या सर्वांची आपल्यास जाणीव असून त्या अनुषंगाने आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याच वेळी रेल्वेची धोरणे, नियम या संबंधात प्रवाशांना अवगत करण्यासाठी व रेल्वेवरील समस्या जाणून घेण्यासाठी प्रवाशांबरोबर जास्तीत जास्त संवाद साधण्यावर भर देणार आहे. ज्या समस्या कोकण रेल्वेच्या कार्यकक्षेबाहेर आहेत त्यांचाही पाठरावा आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT