कोकण

सुकवलीत रोशनी चाळके, खोपीत यशवंत भोसले सरपंच

CD

४६ (पान ३ साठी)

सुकवलीत चाळके, खोपीत भोसले सरपंच

खेड, ता. २० : तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल शुक्रवारी (ता. १८) तहसीलदार कार्यालयात जाहीर करण्यात आला. यामध्ये दोन ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदासाठी आणि एका ग्रामपंचायतीमध्ये दोन सदस्यनिवडीसाठी निवडणूक गुरुवारी शांततेत झाली. तीन ग्रामपंचायतींपैकी खोपी व सुकीवली येथे सरपंचपदासाठी थेट निवडणूक झाली, तर तळवटमध्ये एक स्त्री व पुरुष या पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये ७० टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (ता. १९) सकाळी १० वाजता येथील तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आला. सुकीवलीमध्ये रोशनी राजेंद्र चाळके या ८२५ मतांनी विजयी झाल्या, तर स्वाती श्रीकांत चाळके यांना ४६२ मते पडली. खोपीमध्ये यशवंत विष्णू भोसले ५८५ मतांनी विजयी झाले, तर नंदकुमार चव्हाण यांना ११३ मते मिळाली.
तळवटमध्ये सदस्यपदाच्या निवडणुकीत कुंदा अंकुश मोरे यांना ४२ मते पडली तर रागिणी रणजित तांबे यांना ४७ मते पडल्याने तांबे या विजयी झाल्या. या ग्रामपंचायतीमधील प्रभाग २ साठी झालेल्या पुरुष सदस्यपदासाठी लक्षमीकांत रघुनाथ पालांडे हे ५० मतांनी विजयी झाले, तर अनिल दाजी तांबे यांना ४६ मते पडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

SCROLL FOR NEXT