कोकण

टेम्पोची धडक बसल्याने तोरसोळेत मोटार उलटली

CD

04025
देवगड ः अपघातग्रस्त मोटार.

टेम्पोची धडक बसल्याने
तोरसोळेत मोटार उलटली

देवगड, ता. २० ः देवगड-नांदगाव मार्गावरील तोरसोळे फाटा (ता.देवगड) नजिक मोटार आणि टेम्पोमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातग्रस्त मोटार रस्त्याकडेला उलटून चालकासह आतील प्रवाशी किरकोळ जखमी झाले. आज सायंकाळी ही घटना घडली. जखमींवर शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. अपघाताची नोंद येथील पोलिस ठाण्यात करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अपघातातील टेम्पो नांदगावच्या दिशेने निघाला होता. तर मोटार नांदगावहून देवगडच्या दिशेने येत होती. तोरसोळे फाटा येथे दोन्ही वाहनांमध्ये धडक झाली. मोटार रस्त्याकडेला उलटल्याने चालकासह काहीजण किरकोळ जखमी झाले. अपघातग्रस्त मोटार मांगवली (ता. वैभववाडी) येथून देवगडच्या दिशेने जात होती. अपघाताची माहिती मिळताच येथील पोलिस हवालदार अमित हळदणकर, हवालदार आशिष कदम, पोलिस नाईक महेंद्र महाडिक यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीस मोकळा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT