कोकण

गुहागर-नरवणमध्ये निवृत्त मुख्याध्यापक गुरव यांचा विशेष सन्मान

CD

ratghu234.jpg-
04567
नरवण धरणवाडीः सोमेश्वर मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी. पी. गुरव यांचा विशेष सन्मान करताना शंकर कुळये, सुनील मोरे, दत्ताराम गोणबरे, चंद्रकांत बाचीम आदी.
--------------------
नरवणमध्ये गुरव यांचा सन्मान
गुहागर, ता. २४ ः तालुक्यातील नरवण-धरणवाडी येथील सोमेश्वर मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाचे महत्त्व पटवून देवून वाडीतील अनेकांना घडविणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय तथा डी. पी. गुरव यांचा विशेष सन्मान मंडळाने केला.
यावर्षी अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने सलग आठ दिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले होते. मंडळाच्या गेल्या ७५ वर्षांच्या कार्याचा लेखाजोगा मांडणारी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. वार्षिक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून या सोहळ्याची सांगता झाली. मंडळातर्फे वाडीतील प्राथमिक शाळेत आपल्या नोकरीची सुरवात करणाऱ्या दत्तात्रय परशुराम तथा डी. पी. गुरव यांचा विशेष गौरव करण्यात आला. सत्तरीच्या दशकात प्रतिकूल परिस्थितीत दत्तात्रय गुरव यांनी नरवण-धरणवाडी येथे शिक्षकाच्या नोकरीला सुरवात केली. ग्रामीण भागातील शाळा असूनही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. त्यांच्या या समाजोपयोगी कार्याचा सन्मान मानपत्र, सन्मानचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मंडळाच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाला नरवण कुणबी मंडळाचे अध्यक्ष अनंत मालप, कार्याध्यक्ष बाळ गोताड, धरणवाडी सोमेश्वर मंडळाचे मुंबई अध्यक्ष शंकर कुळये, सचिव सुनील मोरे, स्थानिक अध्यक्ष दत्ताराम गोणबरे, उपाध्यक्ष चंद्रकांत बाचीम, खजिनदार स्थानिक विठ्ठल कुळ्ये, शांताराम कुळ्ये, चंद्रकांत गोणबरे, प्रकाश जोगळे, सुलोचना कुळ्ये, स्वाती कुळ्ये उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT