कोकण

पालकमंत्री सामंत - रमेश कदम भेटीची चर्चा रंगली

CD

पान १ साठी)

०४५५९
सामंत-रमेश कदम भेटीची चर्चा रंगली
सदानंद चव्हाणांना केले सामील; माणसे जोडणे सुरू
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः येथील माजी नगरसेवक उमेश सकपाळ माझ्यासोबत हेलिकॉप्टरने मुंबईला आले आणि चर्चा रंगल्या. आज येथील माजी आमदार रमेश कदम यांच्याकडे स्नेहभोजनाला जात आहे. कदमांसाठी माजी आमदार व आमचे उपनेते सदानंद चव्हाण यांनी हिरवा कंदील दिला आहे. आता त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. कदमांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी. ही चर्चा फलदायी होते का ते बघू या, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळुणात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पालकमंत्री उदय सामंत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘दोन दिवसांत मी दोन वेळा आलोय. ४८ तासांत गाळासाठी ५० लाखांचा निधी दिला आहे. विकासकामांच्या भूमिपूजनावेळी मी दोन आमदारांच्या मधोमध बसलो होतो. यावेळी माजी आमदार रमेश कदम यांनी आपल्याला मार्गदर्शकाच्या भूमिकेत सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आज त्यांच्याकडे स्नेहभोजनाला जात आहे. त्यामुळे चर्चा तर होणारच. कदम हे ज्येष्ठ राजकारणी आहेत. चिपळूण मतदारसंघात त्यांचे वलय आहे. त्यांना पक्षात घेण्यासाठी माजी आमदार व उपनेते सदानंद चव्हाण यांनी सहमती दिली आहे. त्यामुळे आज त्यांना सोबत घेत कदमांकडे जात आहे. परवा उमेश सकपाळ माझ्याबरोबर आले आणि चर्चा रंगली, मात्र त्यातून पुढे काही निष्पन्न झाले नाही. आता कदमांबरोबर चर्चा करून काही निष्पन्न होतेय का बघूया.’’
आगामी लोकसभा, विधानसभा, पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सामंत अॅक्टिव्ह मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातून ते शिंदे गटाच्या शिवसेनेकडे अनेक माणसे जोडत असतानाचे दिसत आहे.


राजकीय चर्चा नाही ः कदम
पालकमंत्री सामंत यांच्या भेटीनंतर माजी आमदार रमेश कदम यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘‘पालकमंत्र्यांशी जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत. १९९९ पासून ते आपल्याशी जोडले आहेत. एकेकाळी आम्ही एकाच पक्षात काम केले आहे. पालकमंत्र्यांनी घरी सदिच्छा भेट दिली आहे. ही घरगुती भेट होती. तिथे कसलीही राजकीय चर्चा झालेली नाही.’’ तरीही या भेटीमागे काहीतरी दडले असावे, अशी चर्चा चिपळुणात रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT