कोकण

‘वंदे भारत’ १५ जूनपासून कोकणात धावण्याची शक्यता

CD

कोकणात १५ जूनपासून
‘वंदे भारत’ धावण्याची शक्यता
कणकवली, ता. २४ ः भारतीय बनावटीची बहुचर्चित मुंबई ते गोवा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ कोकण रेल्वे १५ जून रोजी धावण्याची शक्यता आहे. या मार्गावर वर्षभर प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते गोवा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ही गोव्यासाठी पहिली आणि मुंबईसाठी चौथी एक्स्प्रेस असेल. कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रक येत्या १० जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान लागू होणार आहे. याच दरम्यान आणि गणेशोत्सवापूर्वी ही गाडी धावण्याची शक्यता आहे.
मुंबई-गोवा वंदे भारत मुंबई-गोवा दरम्यान १८० कि.मी. प्रति तास वेगाने धावू शकते. मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचा रेक वापरून गोवा-मुंबई मार्गावर चाचणी गेल्या आठवड्यात घेण्यात आली. मुंबई-अहमदाबाद, मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या तीन वंदे भारत एक्स्प्रेस सध्या धावत आहेत. सध्या, मुंबई आणि गोवा दरम्यान सर्वांत वेगवान गाडी तेजस एक्स्प्रेस धावत आहे. ही गाडी ८ तास ५० मिनिटे वेळ घेते. मुंबई ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस त्यापेक्षा १ तास ५० मिनिटे कमी वेळात पोहचणार आहे.
मुंबई ते मडगाव प्रवास करताना सह्याद्रीचे डोंगर आणि धबधब्यांची विलक्षण दृश्ये पाहता येणार आहेत. ही गाडी दादर, ठाणे, चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळ या स्थानकांवर थांबत मडगावपर्यंत ५८० किमी अंतर धावेल. भारतीय रेल्वेने अद्याप अंतिम थांब्यांची यादी जाहीर केलेली नाही. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ५.३० वाजता सुटेल आणि दुपारी १२.३० वाजता गोव्यातील मडगाव स्थानकात पोहोचेल. हीच गाडी परतीसाठी मडगाव येथून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि रात्री ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. मुंबई ते मडगाव तिकिटाची किंमत एससी चेअर कार वर्गातील एका प्रवासासाठी सुमारे १५८० रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी २८७० रुपये अपेक्षित आहे. ही गाडी दर मंगळवारी बंद राहणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT