कोकण

आता मात्र मी भाजपमध्येच

CD

04673
मालवण ः बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांनी बुधवारी रात्री भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

आता मात्र मी भाजपमध्येच

बुधवळे सरपंचांचे स्पष्टीकरण; दोन्ही पक्षांतर्फे दावे-प्रतिदावे

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २४ : बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांनी सोमवारी रात्री माजी खासदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला; मात्र बुधवारी (ता.२३) सकाळी आपल्याला फसवून आमदार नाईक यांच्याकडे नेण्यात आले आणि पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला असे दाखवले; मात्र आपण ग्रामस्थ यांच्या पाठींब्याने भाजप पक्षात प्रवेश केला, असे स्पष्टीकरण सरपंच संतोष पानवलकर यांनी काल रात्री दिले.
गावचा विकास भाजप करू शकतो. त्यामुळे आपण भाजमध्येच आहोत, असे सरपंच पानवलकर यांनी काल रात्री येथील भाजप कार्यालय येथे स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत भानुदास येरम, अनिल येरम, उल्केश येरम, प्रकाश पाताडे, विश्वास हिरलेकर, गुरूदास घाडी तसेच भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, राजन गावकर, महेश मांजरेकर, मंगेश गांवकर, संतोष कोदे, संतोष गावकर, दीपक सुर्वे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT