कोकण

शिक्षकांची नियुक्ती करा, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळा

CD

04798
देवगड ः गटविकास अधिकारी करिश्मा नायर यांना भाजपच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी सुनील पारकर, संतोष किंजवडेकर आदी उपस्थित होते. (छायाचित्र ः वैभव केळकर)

शिक्षकांची नियुक्ती करा,
विद्यार्थ्यांचे नुकसान टाळा

देवगडमध्ये भाजपची प्रशासनाकडे मागणी

देवगड, ता. २४ ः तालुक्यातील काही शिक्षकांची आंतरजिल्हा बदली केल्याच्या विषयाकडे येथील तालुका भाजपच्यावतीने पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. आपल्या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी करिश्मा नायर यांना भाजपच्यावतीने देण्यात आले.
शिक्षक संख्येच्या अनुषंगाने भाजप पदाधिकाऱ्यांनी येथील गटविकास अधिकारी नायर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी माजी सभापती सुनील पारकर, भाजप देवगड मंडल अध्यक्ष संतोष किंजवडेकर, संजय बांबुळकर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यामध्ये २१२ प्राथमिक शाळा आहेत. यापूर्वी ३८ प्राथमिक शाळांमध्ये एकही शिक्षक नियुक्त नाही, ही गंभीर बाब आहे. याबाबत प्रशासनाने कोणताही विचार न करता एप्रिलमध्ये १४ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली करून त्यांना कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळेकडे वळावे लागत आहे. प्राथमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. याची तातडीने दखल घ्यावी. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांच्या फेरनियुक्त्या कराव्यात. तसे न घडल्यास तालुक्यातील पालक आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याच्या मानसिकतेत आहेत. याची वेळीच दखल घेऊन त्वरित शिक्षकांची नियुक्ती करावी व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT