कोकण

कोळोशी परिसरात वणव्यात काजू बागा जळून भस्मसात

CD

swt२५१.jpg
M04916
कोळोशीः वरचीवाडी येथील आगीत जळालेली काजू कलमे दाखविताना अनिल इंदप.

कोळोशी परिसरात वणव्यात
काजू बागा जळून भस्मसात
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २५ः कोळोशी वरचीवाडी येथील सुपाचा माळ येथे लागलेल्या वणव्यात अनिल इंदप यांची सुमारे ३०० हून अधिक काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. लगतच्या इतर बागायतदारांनाही याचा फटका बसला. या आगीमुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले.
कोळोशी वरचीवाडी व आयनल मनेरवाडीच्या सीमेवर काही दिवसांपूर्वी दुपारच्या सत्रात अचानक आग लागली. काही मिनिटांतच आगीने रौद्ररुप धारण करून आजूबाजूचा सर्व परिसर आपल्या विळख्यात घेतला. या वणव्याने सर्व रानमाळ बेचिराख केला. यामध्ये अनिल इंदप यांची सुमारे ३०० हून अधिक काजू कलमे, वैभव सावंत यांची काजूबाग होरपळून गेली‌. आगीचा भडका इतका भयंकर होता की शेतकऱ्यांना डोक्याला हात लावून पाहण्यापलीकडे दुसरा पर्याय नव्हता. या आगीत मोठा परिसर बेचिराख झाल्याने माळरानावर गुरांना वैरणही शिल्लक राहिली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही; मात्र बागायतदारांचे मोठे नुकसान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT