कोकण

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याकडे लक्ष द्या

CD

०५१६८

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याकडे लक्ष द्या
नीतेश राणे ः जामसंडेत कृषी महोत्सवाचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २६ ः कार्यालयातील अधिकारी व्यक्तीपेक्षा त्यांच्या पदाच्या खुर्चीकडून जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा असतात. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करून त्यांना समाधानी करण्याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. तरच ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा उद्देश खऱ्‍या अर्थाने सफल होईल, असे मत आमदार नीतेश राणे यांनी जामसंडे येथे व्यक्त केले. जनतेचे प्रश्‍न निकाली निघाले तरच लोकांच्या अडीअडचणी सोडवणारे राज्याचे सरकार आहे, अशी भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जामसंडे येथील सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘कृषी प्रदर्शन व कृषी महोत्सव’ कार्यक्रमाचे उद्‍घाटन आमदार श्री. राणे यांच्या उपस्थितीत झाले त्या वेळी ते बोलत होते. मंचावर माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, अर्बन बँक अध्यक्ष सदाशिव ओगले, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, परिविक्षाधीन तहसीलदार स्वाती देसाई, गटविकास अधिकारी करिश्मा नायर, तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र राठोड, पशुधन विकास अधिकारी एम. एन. घोगरे, विस्तार अधिकारी अंकुश जंगले, कृषि अधिकारी दिगंबर खराडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
श्री. राणे म्हणाले, ‘‘लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडावे, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पुढे यावे. यातून जनतेच्या मनामध्ये शासन आपल्या हक्काचे असल्याची जाणीव निर्माण होईल. जनतेचे प्रश्‍न सुटल्यास त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव दिसतील. त्यामुळे व्यक्तीपेक्षा कार्यालयातील खूर्चीकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सज्ज असले पाहिजे. अशा कार्यक्रमामधून नागरिक समाधानाने घरी गेले पाहिजेत. त्यामुळे जनतेला सेवा देऊन त्यांचे प्रश्‍न सोडवण्यावर भर द्यावा.’’
या वेळी श्री. कातकर, श्री. राऊत, स्वाती देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन करून आभार प्रदीप कदम यांनी मानले. कृषि प्रदर्शनामध्ये विविध आंब्याच्या जातींची माहिती तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT