कोकण

वैद्यकीय शिक्षण मराठीतून द्या वैद्यकीय शिक्षण मराठीतून करा

CD

05225
सिंधुदुर्गनगरी ः निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना निवेदन देताना श्रीकांत सावंत. सोबत नामदेव मठकर.

वैद्यकीय शिक्षण मराठीतून द्या

मानवता विकास परिषद; निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २६ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेला मान देऊन मेडिकल कॉलेजचे शिक्षण मराठीतूनच देण्यासाठी शासन स्तरावर ती योग्य ती कार्यवाही व्हावी आणि यावर्षीपासून मराठीतून शिक्षण सुरू व्हावे, अशी मागणी मानवता विकास परिषद मुंबईच्यावतीने एक निवेदन संस्थापक तथा मसुरे गावचे सुपुत्र अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आणि सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचे डीन प्रकाश गुरव यांना देऊन या प्रश्नाबाबत लक्ष वेधले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मातृभाषेतून शिक्षण झाले तर खेड्या खेड्यातून डॉक्टर शिक्षणासाठी तयार होतील. याचा लाभ तळागाळातील विद्यार्थ्यांना होणार आहे आणि यातूनच खेड्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे. आपल्या मराठी माध्यमातून वैद्यकीय शिक्षण सुरू केल्यास याचा लाभ खऱ्या अर्थाने कोकणातील सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे. यासाठी शासन स्तरावरती योग्य तो पाठपुरावा करण्यासाठी मानवता विकास परिषदच्यावतीने पुढाकार घेण्यात येणार आहे, अशी माहिती मानवता विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष सावंत यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते नामदेव मठकर आणि मानवता विकास परिषदचे सदस्य उपस्थित होते.
-----------
कोट
वैद्यकीय शिक्षण मराठीतून व्हावे, याबाबत लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्री, केंद्रीय आरोग्य मंत्री, पंतप्रधान मोदी यांनाही निवेदन देऊन लक्ष वेधण्यात येणार आहे.
- श्रीकांत सावंत, संस्थापक, मानवता विकास परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT