कोकण

उष्णतेमुळे दूध उत्पादनात 40 टक्केने घट

CD

उष्म्यामुळे दूध उत्पादनात ४० टक्केने घट
दाभोळ, ता. २७ः सध्या कोकणात कडक उन्हामुळे दूध उत्पादनात तब्बल ४० टक्के घट झाली आहे. यामुळे कोकणात या जोड व्यवसायावर अवलंबून असणारा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दापोलीचे तापमान काहिलीपर्यंत जाऊन पोहोचले आहे. यामुळे मनुष्यप्राण्यांसह प्राणिमात्रांनादेखील याच्या झळा जाणवत आहेत. उष्म्यामुळे दूध उत्पादनातदेखील ४० टक्क्यांपर्यंत घट झाल्याची माहिती दूध उत्पादक व्यावसायिकांनी दिली.
दापोलीत अनेकांचा दुधाचा जोडधंदा आहे. दर उन्हाळ्यामध्ये जनावरांच्या दूध उत्पादनात कमालीची घट होते. त्यामुळे ज्यांना अतिरिक्त दुधाची गरज असते अशांना दूध देणे बंद करण्यात येते. जे नेहमीचे उकाडे आहेत, अशांनाच दूध विक्री सुरू ठेवता येते. दूध उत्पादनात घट झाल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसतो. घटीचे प्रमाण कमी करण्याकरिता काही ठिकाणी म्हशींवर गार पाण्याचे फवारे मारण्यात येतात, तर काहीजण गोठ्यात २४ तास पंखे लावतात. गोठ्यांवर पेंढा टाकून उकाडा कमी केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसच्या उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT