कोकण

''कास्ट्राईब''ची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

CD

०५५३४

‘कास्ट्राईब’ची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक
विविध विषयांवर चर्चा ः अनुकंपासह सफाई कामगार प्रश्नांबाबत सक्त आदेश
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः माध्यमिक शिक्षण विभागातील अनुकंपा भरती आणि सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी यांच्या सोबतच्या बैठकीत सक्त आदेश देण्यात आल्याची माहिती कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासोबत त्रैमासिक सहविचार सभा जिल्हाधिकारी दालनात महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम आणि राज्य अतिरिक्त महासचिव सुरेश तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच झाली.
सभेच्या सुरुवातीला सर्व कार्यालयांतील सरळ सेवा भरती अनुशेष भरण्याबाबतची माहिती विचारण्यात आली. सर्व खातेप्रमुखांनी शिल्लक अनुशेषाबाबत माहिती दिली. मोठ्या प्रमाणात अनुशेष शिल्लक असल्याचे कास्ट्राईब संघटनेने प्रशासनाच्या लक्षात आणून देत अनुशेष भरण्याच्या दृष्टीने आवश्यक पाठपुरावा करण्याबाबत सांगण्यात आले. शासन निकषानुसार वेळोवेळी पदोन्नतीबाबत आढावा घेऊन त्याप्रमाणे आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्याबाबत कास्ट्राईब संघटनेने बैठकीत सूचित केले.
अनुकंपा पदभरती संदर्भात आढावा घेतला असता सर्व खातेप्रमुखांनी अनुकंपा भरती पूर्णपणे केलेली असल्याचे सांगितले; मात्र माध्यमिक शिक्षण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात अनुकंपा भरती प्रक्रिया राबविली गेली नाही. प्रामुख्याने नचिकेत पवार, सचिन कानडे, विशाल कांबळे यांच्या संदर्भात आजच्या आज बैठक घेऊन तत्काळ निर्णय घेण्याबाबत माध्यमिक विभागाला सूचना दिल्या. शासन परिपत्रकाप्रमाणे योग्य ते मार्गदर्शन घेऊन लवकरात लवकर माध्यमिक विभागातील संपूर्ण अनुकंपा भरती पूर्ण करावी आणि तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना द्यावा, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांना सांगण्यात आले. माध्यमिक विभागामध्ये रोस्टर डावलून पद भरणे, प्रशालेत पद रिक्त नसताना शिक्षक भरती करणे, चुकीच्या पद्धतीने मागासवर्गीय शिक्षकांना अतिरिक्त करणे, सेवाज्येष्ठता डावलणे, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकपदी मागासवर्गीय शिक्षकांना नियुक्ती करताना विलंब करणे, प्रस्ताव परिपूर्ण असताना मुख्याध्यापकांना प्रभारी मान्यता देणे, अपूर्ण प्रस्तावांना शिक्षक मान्यता देऊन त्याआधारे शिक्षक शालार्थ आयडी आणणे, कोर्ट केसेसचा हवाला देऊन शिक्षक मान्यता देणे, अशा अनेक तक्रारी कास्ट्राईब संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमिक विभागाबाबत अनेक तक्रारी नेहमीच असतात, असे सांगून तत्काळ याबाबत निर्णय घेण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांना दिले. जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत, ग्रामपंचायत, आरोग्य विभागाअंतर्गत सफाई कामगारांना किमान वेतन, प्रॉव्हिडंड फंड, सफाई कामगारांची आरोग्य तपासणी, पोषाख, इतर सोयी-सुविधा मिळत नसल्याचे कास्ट्राईब संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. सफाई कामगांराबाबत कास्ट्राईब संघटना वारंवार प्रशासनाकडे प्रश्न मांडूनही ते सुटलेले नाहीत. त्यामुळे सर्व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी, सर्व सफाई ठेकेदार आणि संबंधित सर्व अधिकारी आणि कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी स्तरावरून बोलवावी, अशी मागणी संघटनेने केली. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी अशी बैठक घेऊन सफाई कामगारांचे प्रश्न निकाली काढण्याबाबत प्रशासनाला आदेश दिले. शासन परिपत्रकाप्रमाणे सर्व खातेप्रमुखांनी कास्ट्राईब संघटनेच्या त्रैमासिक सभा घेऊन त्यांना इतिवृत्त देण्याबाबत सूचना दिल्या. आरोग्य विभागाचा कोणताही अधिकारी सभेस उपस्थित नसल्याबाबत त्यांच्याकडून लेखी खुलासा घेण्याच्या सूचना दिल्या.
सभेस कास्ट्राईब आरोग्य विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय पेंडूरकर, जिल्हा सचिव अभिजित जाधव, आरोग्य विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र कदम, नचिकेत पवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तसेच उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्राथमिक शिक्षणाधिकारी धोत्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, अनामिका जाधव, एस. एस. कांबळे, पी. एल. पवार, पी. डी. पिसाळ, व्ही. टी. देसाई, ए. सी. अडकुले, ए. बी. गावडे आदी खातेनिहाय प्रमुख अधिकारी उपस्थित होते. संजय पेंडूरकर यांनी आभार व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

SCROLL FOR NEXT