कोकण

रत्नागिरी-जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील पाणी स्वच्छ

CD

जिल्ह्यात चार तालुक्यांतील पाणी स्वच्छ

९४४ पैकी केवळ १४ नमूने दूषित ; पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून तपासणी
रत्नागिरी, ता. २९ : जिल्ह्यात पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून तपासण्यात आलेल्या ९४४ पाणी नमुन्यांपैकी १४ नमुने प्रयोगशाळेत दूषित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील केवळ १.४८ टक्के पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये चार तालुक्यांतील पाण्याचा एकही नमुना दूषित नसल्याचे आढळून आले.
रत्नागिरी जिल्हा स्वच्छतेमध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. दूषित पाण्यामुळे कावीळ, अतिसार, गॅस्ट्रो आदी साथीचे आजार कुठेही पसरलेले आढळून येत नाही. कारण जिल्ह्यात ग्रामपंचायतींकडून टी. सी. एल. पावडर देण्यात येते. प्रत्येक महिन्याला जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाणी स्रोतांचे नमुने घेतले जातात. त्या नमुन्यांची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येते. नमुना दूषित आल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना करतात. जिल्ह्यातील दापोली, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये एकही नमुना दूषित नाही. जिल्ह्यातील गोळा केलेल्या ९४४ पाणी नमुन्यांपैकी १४ नमुने दूषित आढळून आले. दूषित पाण्यामुळे अतिसार, कॉलरा, विषमज्वर, कावीळ, गॅस्ट्रो, हगवण, आमांश, पोलिओ, खरुज असे विविध आजार होतात. त्यामुळे स्वच्छ पाणी वापरल्यास आरोग्य चांगले राहते. दूषित पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन वेगवेगळे आजार होतात. पाण्याचा अति उपसा, कारखान्यातील पाणी प्रक्रिया न करता सोडणे, घरगुती घनकचरा व सांडपाणी, टाकाऊ पदार्थ जमिनीवर टाकणे व पुरणे, रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर, उघड्यावरील विष्ठा ही पाणी दूषित होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी टी.सी.एल. पावडरचा उपयोग करण्यात येतो. पाण्याची दोन प्रकारे तपासणी करण्यात येते, त्यामध्ये जैविक, रासायनिक तपासणी केली जाते. पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी शुद्ध पाणी प्यावे, पाणी उकळून प्यावे, मेडिक्लोअरचा वापर करावा, पाणी फिल्टर करून पिणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT