कोकण

मृत माशांच्या दुर्गंधीने सावंतवाडी हैराण

CD

05690
05717
सावंतवाडी ः मोती तलावातील पाणी सोडल्याने मृत्यूमुखी पडलेले मासे.

मृत माशांच्या दुर्गंधीने सावंतवाडी हैराण

मोती तलावातील स्थिती; पाणी सोडल्याने प्रकार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः येथील तलावातील गाळ काढणे व संरक्षण भिंतीचे काम करण्यासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तलावातील कित्येक मासे मृत झाले आहेत. या मृत माशांचा खच तलावात तसेच सबनीसवाडा परिसरातील नाल्यात पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाक मुठीत धरुन वावरावे लागत आहे.
येथील मोती तलावातील दुसऱ्या भागातील पाणी काल (ता.२८) सोडण्यात आले. त्यामुळे तलाव पूर्ण कोरडा पडला आहे. पाणी सोडण्याने आतील मासे मृत झाले आहेत. परिणामी तलाव परिसरात तसेच सबनीसवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना येता जाता नाकावर हात धरण्याची वेळ आली आहे. तलावातील पाणी सबनीसवाडा येथील नाल्यात सोडल्याने संपूर्ण नालाभर मृत माशांचा खच पडून आहे. हे मासे कुजल्याने त्यांना भयंकर दुर्गंधी सुटली आहे. सबनीसवाडा परिसरातील नाल्याला लागून वस्ती आहे. येथील नागरिकांना घरात थांबणेही मुश्कील झाले आहे. मुळात पाणी सोडण्याआधी हे मासे पकडणे गरजेचे होते किंवा तशी यंत्रणाही राबविणे गरजेचे होते; मात्र, याचा काहीही विचार न करता पाणी सोडण्यात आले. या पसरलेल्या दुर्गधीमुळे व कुजलेल्या माशांमुळे आरोग्याच्या बाबतीत तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे पालिकेने आवश्यक उपाययोजना राबवून हे या माशांची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
---
लोकांच्या आरोग्याशी खेळ?
दरम्यान, मृत माशांच्यामुळे पसरलेल्या दुर्गंधीबाबत पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे तसेच आरोग्य निरिक्षक पांडुरंग नाटेकर यांच्याशी संपर्क साधला असता हे मासे उचलण्यासाठी माणसे पाठविण्यात येतील, असे सांगण्यात आले; मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत पालिकेचे कर्मचारी तेथे आलेच नव्हते. त्यामुळे पालिका प्रशासन लोकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप नागरिकांतून करण्यात आला.
--------
चौकट
भटक्या कुत्र्यांकडून मासे रस्त्यावर
तलावाचे पाणी सबनीसवाडा येथील नाल्यात सोडल्याने संपूर्ण नालाभर मृत माशांचा खच पडला आहे. हे मृत मासे भटक्या कुत्रे तसेच कावळे, इतर पक्षांकडून रस्त्यावर तसेच वस्तीत टाकले जात आहेत. याचा त्रास वस्तीतील नागरिकांसह ये-जा करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सबनीवाडा परिसरात येऊन पाहणी करुन तत्काळ उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी तेथे राहणाऱ्या नागरिकांकडून होत आहे.
--------
कोट
05689
मोती तलावातील पाणी सोडल्याने तलाव तसेच सबनीसवाडा परिसरातील नाल्यात मृत माशांचा खच पडला आहे. मृत माश्यांमुळे दुर्गंधी येत असून नागरिकांना नाक मुठीत धरण्याची वेळ आली आहे. दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. याबाबत पालिका प्रशासनाने तात्काळ योग्य भूमिका घ्यावी.
- आशिष सुभेदार, माजी शहराध्यक्ष, मनसे
----------
05716
आम्ही सबनीसवाडा परिसरातील राहत असून गेले दोन दिवस दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दोन दिवस उलटूनही पालिका प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना आखल्या गेल्या नाहीत. त्यामुळे पालिका प्रशासनाने याकडे त्वरीत लक्ष देऊन व परिसर दुर्गंधीमुक्त करावा.
- रॅनोल्ड डान्टस, रहिवाशी, सबनीवाडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT