कोकण

दाभोळ-दिव्यांग मर्चंडे यांचा आत्मदहनाचा इशारा

CD

दिव्यांग मर्चंडे यांचा
आत्मदहनाचा इशारा
दाभोळ, ता. ३० ः विविध समस्यांबाबत प्रशासनाकडे पत्रव्यवहार, निवेदने देऊनदेखील शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने दिव्यांग धनाजी मर्चंडे यांनी न्याय न मिळालयास उद्या बुधवारी (ता. ३१) मे रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
वडील रामचंद्र महादेव मर्चंडे यांच्या २००४ मध्ये मृत्यूनंतर त्यांचा वारस फेरफारने अर्जदार, आई व बहीण असे ५ जण वारस म्हणून लागले. अर्जदारांचे सामाईक खाते क्र. १८२ मध्ये २००८ ला मयत खातेदार सावित्री महादेव मर्चंडे यांचा वारस तपास फेरफार १८८३ मध्ये तलाठी सजा पिसई यांनी नजरचुकीने सर्वे नं. ४८, २८, ३ हाही सातबारा दाखवल्याने इतर खातेदारांची नावे मिळकतीत दाखल झाली. पुन्हा २००९ मध्ये मयत खातेदार धोंडूराम महादेव मर्चंडे यांचा वारस तपास फेरफार क्र. १९९२ ने इतर नावे दाखल झाली. याबाबत तलाठी, उपविभागीय अधिकारी यांना वारंवार कळवून, अर्ज करून तसेच अपील दाखल करूनही अद्याप न्याय मिळालेला नाही. मर्चंडे हे दिव्यांग असल्याने तहसील कार्यालयात झेरॉक्स सेंटर सुरू करण्याची मागणी करत आहेत; मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले. मर्चंडे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याकडेही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे. या समस्या न सोडवल्यास आत्मदहनाचा इशारा मर्चंडे यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT