कोकण

रत्नागिरी- बैठकांचे आयोजन

CD

कृतज्ञता मासानिमित्त
भाजपातर्फे बैठकांचे नियोजन

अॅड. दीपक पटवर्धन ; ५०० कार्यकर्त्यांची फळी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला ९ वर्षे पूर्ण झाली आहे. या नऊ वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या विविध विकास कामांचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी जून महिना हा कृतज्ञता मास म्हणून पाळला जाणार आहे. याकरिता भाजपाच्या विविध ठिकाणी बैठका आयोजित केल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
शनिवारी (ता. ३) सकाळी अकरा वाजता नियोजन बैठक भाजपा जिल्हा कार्यालयात संयोजक विजय सालीम यांच्या अध्यक्षतेखाली होईल. ४ जूनला राजापूर येथे संयोजक रवींद्र नागवेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. ५ जून रोजी संगमेश्वर येथे संयोजक प्रमोद अधटराव यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक होईल. ६ जून रोजी रत्नागिरी- सिंधुदुर्गमधील संयोजकांची यांची बैठक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये कसाल येथील मेडिकल कॉलेज येथे होणार आहे. राजापूर तालुक्याची बैठक ८ जून रोजी गुरूमाऊली हॉटेलमध्ये होणार आहे. या सर्व बैठकांना त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
रत्नागिरी-सिंधुदु्र्ग जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघात ५०० कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात आली आहे. हे कार्यकर्ते प्रत्येक स्तरातील जनतेच्या घरोघरी जाऊन मोदी सरकारच्या कामाचा प्रचार करून दोन वेळा निवडून दिल्याबद्धल कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या कृतज्ञता मासाचे प्रमुख आहेत. यात राष्ट्रीय सुरक्षा, कोरोना काळातील काम, मंदिरांमधून संस्कृतीचे पुनर्जीवन, क्युआर कोड, युपीआय क्रमांक, पायाभूत सुविधा, स्वच्छ भारत मिशन, एक देश एक कर, लोककल्याणकारी योजना, आयुर्वेद व योगा दिन अशा विभागांतील माहिती जनतेला देण्यात येणार आहे. शनिवारी (ता. ३) रत्नागिरी रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दुपारी दीड वाजता रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे जमावे, असे आवाहनही जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT