कोकण

आंबोली पर्यटनासाठी ७ कोटी १९ लाख

CD

आंबोली पर्यटनासाठी ७ कोटी १९ लाख
सावंतवाडी, ता. ३ ः प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत २०२२-२३ व विशेष दुरुस्ती तसेच अर्थसंकल्प माध्यमातून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांतून आंबोली पर्यटनस्थळासाठी व तेथील रस्त्यांच्या दुरुस्ती व नवीन बांधकामासाठी ७ कोटी १९ लाखाचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते तथा माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे व तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी दिली. आंबोली हिरण्यकेशी पॉईंट रस्ता, सावंतवाडी-आंबोली-महादेवगड रस्ता, वेंगुर्ले-आंबोली-विशेष बेळगाव रस्ता अशी विकासकामे होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र तथा चव्हाण यांच्या सहकार्याने हा विकासनिधी मंत्री केसरकर यांनी उपलब्ध करून आणल्याचे पोकळे यांनी स्पष्ट केले.
---------------
शासकीय कामासाठी ‘ई-ऑफिस’ प्रणाली
सिंधुदुर्गनगरी, ता. ३ ः जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखा व सर्व मंत्रालयीन कर्मचारी यांचे कामकाज ई-ऑफिस प्रणालीद्वारे १ मेपासून कार्यान्वित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली. संगणकीय प्रणालीद्वारे संबंधितास एसएमएसच्या माध्यमातून आपले टपाल सध्या कोणत्या पोलिस ठाण्याकडे आहे, याबाबतची माहिती मिळू शकणार आहे. त्याचप्रमाणे प्राप्त टपाल ई-ऑफिसच्या माध्यमातून संबंधितास पुढील कार्यवाहीस प्राप्त होणार असल्यामुळे सर्व शाखा, पोलिस ठाणी तसेच उपविभागीय कार्यालयांच्या कामकाजामध्ये एकसूत्रिपणा व गतीशिलता येऊन कामकाजास जलद होणार आहे, असे ते म्हणाले.
-----------------
वैश्य समाजाची आज वेंगुर्लेत वार्षिक सभा
वेंगुर्ले, ता. ३ ः तालुका वैश्य समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या (ता. ४) आयोजित केली आहे. येथील साई मंगल कार्यालयात सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या सभेत आगामी अंदाजपत्रकाला मंजुरी देणे, गुणवंत विद्यार्थी गुणगौरव खर्चाला मंजुरी देणे, सुधारीत घटनेस मान्यता देणे, पुढील वर्षाच्या जिल्हा मेळाव्यासंदर्भात चर्चा करणे आदी विषय आहेत. तालुक्यातील बहुसंख्य ज्ञातीबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष सुनील डुबळे, कार्यवाह कपिल पोकळे यांनी केले आहे.
------------------
पाट येथे शुक्रवारी ‘त्रिपुरासूर’ नाटक
कुडाळ, ता. ३ ः पाट-माऊली मंदिर येथे हौशी मित्रमंडळाच्यावतीने माउली मंदिर रंगमंचावर ९ जूनला सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध दशावतार कलाकारांचे ‘त्रिपुरासूर’ हे संयुक्त दशावतारी नाटक होणार आहे. यात गणपती-सुभाष केरकर, रिद्धी-सिद्धी केशव गोसावी, राजा रुक्मांगद-महेंद्र कुडव, मुकुंदा-बंटी कांबळी, गृत्समद-मोरेश्वर सावंत, वाचक्नवी ऋषी- पुरुषोत्तम खेडेकर, इंद्र-दत्तप्रसाद शेणई, ब्रह्मदेव-राजू हरयाण, शंकर-सतीश केळुसकर, विष्णू-गौरव शिर्के, नारद-पंढरीनाथ घाटकर, रंभा-गौतम केरकर, ब्रह्मराक्षस-सतीश बागवे, त्रिपुरासूर-प्रशांत मयेकर यांच्या भूमिका आहेत. नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT