कोकण

‘द केरला स्टोरी’चे मालवणात भाजपतर्फे मोफत आयोजन

CD

06998
मालवण ः मामा वरेरकर नाट्यगृह येथे ‘केरला स्टोरी’ सिनेमा शोचे उद्‍घाटन करताना डॉ. मिलिंद कुलकर्णी, देवदत्त सामंत आदी.

‘द केरला स्टोरी’चे मालवणात
भाजपतर्फे मोफत आयोजन
मालवण, ता. ४ : भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे व प्रदेश कार्यकारिणी सदस्य देवदत्त सामंत यांच्या संकल्पनेतून तालुका भाजपतर्फे आज पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे मोफत ३ शो आयोजित करण्यात आले. डॉ. मिलिंद कुलकर्णी, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत याचे उद्‍घाटन झाले.
यावेळी डॉ. कुलकर्णी, श्री. सामंत, सुनील धुरी यांनी विचार मांडले. हिंदू धर्माचे रक्षण, सुरू असणारी धर्मांतरे रोखणे, मुलांना आपल्या हिंदू धर्माबद्दल माहिती देणे, शिकणाऱ्या मुलींनी कसे सावध राहावे? याबाबत मार्गदर्शन करताना अन्य धर्माचा द्वेष नाही; मात्र, हिंदू धर्माचे रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. धर्मांतर म्हणजे नकळत राष्ट्रांतर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्मांतर केलेल्या अनेकांना त्यावेळी पुन्हा हिंदू धर्मात आणले. धर्मांतर थांबले पाहिजे अन्यथा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही, असे सामंत यांनी सांगितले. सुनील धुरी यांनी आपल्या जिल्ह्यातही अनेक धर्मांतर प्रकार सुरू असल्याची आकडेवारी सांगितली. यावेळी सुदेश आचरेकर, भाऊ सामंत, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, पूजा सरकारे, शहर प्रभारी विजय केनवडेकर, आबा हडकर, विकी तोरसकर, रत्नाकर कोळंबकर, राजू बिडये, मंदार लुडबे, ललित चव्हाण, भाई मांजरेकर, राज कांदळकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT