कोकण

वडापाव विकून दोन्ही मुलांना शिकवले

CD

rat5p6.jpg
07165
श्रीराम आणि आकांक्षा साळवी
-------------
काही सुखद....
.......

वडापाव विकून दोन्ही मुलांना शिकवले
भिकाजी आणि भाग्यश्री साळवींचे परीश्रमाचे सार्थक; आकांक्षा, श्रीरामचे दहावी, बारावीत सुयश
साखरपा, ता. ५ः मुलांना घडवण्याची जिद्द असेल तर परिस्थिती आड येत नाही, हे दाखवून दिले आहे ते धामणी येथील भिकाजी आणि भाग्यश्री या साळवी दाम्पत्याने. वडापावची गाडी चालवत त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिकवले आहे.
धामणी गुरववाडी येथील भिकाजी साळवी आणि पत्नी भाग्यश्री साळवी हे वडापावची गाडी चालवतात. त्यांना शिक्षणाचे महत्व पटले आहे. आपल्या मुलांनी समाजात मोठे व्हावे यासाठी त्यांचे शिक्षण होणे महत्वाचे आहे, हे त्यांनी जाणले आहे. त्यामुळेच आपल्या वडापावच्या व्यवसायातून मिळणाऱ्या अल्पस्वल्प अर्थार्जनावर मुलांची शिक्षणे करतात.
यंदा त्यांची दोन्ही मुले दहावी आणि बारावीच्या महत्वाच्या वर्षांना उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली आहेत. मुलगा श्रीराम साळवी हा बारावीच्या विज्ञान शाखेतून ७५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला तर मुलगी आकांक्षा साळवी ही दहावीमध्ये ८० टक्के मिळवून पास झाली आहे.सुट्टीच्या दिवशी आई-वडील यांना आपली मदत म्हणून श्रीराम आपल्या आई-वडिलांबरोबर दुकानात येतं असे तर मुलगी पूर्ण घरकाम करण्यासाठी घरी थांबायची. दोघांनाही सुरवातीपासूनच अभ्यासात गोडी निर्माण झाली होती. हेच त्यांच्या आई-वडिलांना लक्षात आले आणि आपल्या मुलांना पूर्णपणे शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली.

चौकट
खासगी शिकवणी न लावता यश
महत्वाचे म्हणजे दोघांनाही कोणत्याही विषयाची खासगी शिकवणी न लावता. स्वतःच्या हिमतीवर शिकवले. साळवी यांचा सुमारे पंधरा ते वीस वर्षे वडापावचा व्यवसाय आहे. दोनही मुलं शाळेत जाण्यापूर्वी आणि शाळेतून आल्यावर आपल्या आई-वडिलांना मदत करण्यासाठी तत्पर असत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Collection: जीएसटीने रचला इतिहास! पहिल्यांदाच कलेक्शन 2 लाख कोटींच्या पुढे; सरकार मालामाल

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

Bahubali: Crown Of Blood : "बाहुबली परत येतोय" ; एसएस राजामौली यांनी केली नव्या सिरीजची घोषणा

T20 World Cup 2024 All Teams Squad : भारत, पाकिस्तान, इंग्लंडसह सर्व 20 संघांचा 'स्क्वाड'! जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

SCROLL FOR NEXT