कोकण

साटेली भेडशी क्रीडा संकुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन साटेली भेडशी क्रीडा संकुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

CD

07645
दोडामार्ग ः नियोजित तालुका क्रीडा संकुल इमारत बांधकामाचे अभय आठलेकर यांच्या करवी भूमिपूजन करताना उपसरपंच गणपत डांगी. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व पदाधिकारी. (छायाचित्र ः संदेश देसाई)


साटेली भेडशी क्रीडा संकुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

आॅनलाईन सोहळा; क्रीडाप्रेमींसह इतर मान्यवरांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ६ ः तालुक्यातील साटेली भेडशी येथील होऊ घातलेल्या तालुका क्रीडा संकुलनाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. सावंतवाडी येथून ऑनलाईन पद्धतीने हे भूमिपूजन करण्यात आले. साटेली भेडशी येथील नियोजित तालुका क्रीडांगण संकुल या ठिकाणी आज सकाळी पुरोहितांकरवी उपसरपंच
गणपत डांगी यांच्या हस्ते धार्मिक विधी करण्यात आले.
यावेळी स्क्रीनवर मुख्यमंत्री यांनी केलेल्या ऑनलाईन भूमीपूजन कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर क्रीडांगण येथे उभारण्यात आलेल्या भूमिपूजन कार्यक्रम कोनशीलाचे अनावरण उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, क्रीडापेमी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपसरपंच गणपत डांगी, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भिसे, नामदेव धर्णे, प्रकाश कदम, राजेंद्र निंबाळकर, नंदकिशोर टोपले, तुकाराम टोपले, गोपाळ गवस, श्रीकांत केसरकर, नंदकिशोर म्हापसेकर, पांडुरंग लोंढे, राजाराम टोपले, राजाराम टोपले, राजन मुंज, पंढरीनाथ देऊलकर, गजानन देऊलकर, अनिल मोरजकर, विष्णू मुंज, सिद्धेश पांगम, दादा केसरकर, क्षितिज मणेरकर, निखिल जुवेकर, प्रसाद सरवणकर, सनी केसरकर, ज्ञानेश्वर डांगी, पुरोहित अभय आठलेकर, मंडळ अधिकारी प्रेमानंद सावंत, तालुका क्रीडा अधिकारी एस पी देशपांडे, सार्वजनिक बांधकाम सहाय्यक अभियंता घंटे, श्री. ठाकरे, विजय भागानगरे आदी क्रीडा प्रेमी, ग्रामस्थ तालुका क्रीडांगण पदाधिकारी, विविध गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. दोडामार्ग तालुक्यात सुसज्ज शासकीय क्रीडा संकुल व्हावे अशी मागणी क्रीडा प्रेमी यांची होती. यासाठी भेडशी ग्रामस्थांनी पुढाकार घेत साटेली भेडशी हद्दीतील शासकीय जागा निश्चित करून ती जागा क्रीडा संकुलासाठी मिळावी यासाठी पाठपुरावा केला. तसेच येथील ही उपलब्ध जागा युवावर्ग ग्रामस्थ यांनी अंगमेहनत श्रमदानातून खेळण्यायोग्य केली. याच ठिकाणी विविध क्रीडा, क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून जमणाऱ्या निधीतून या जागेची सुधारणा केली. त्याचबरोबर ही शासकीय जागा क्रीडा संकुलासाठी मिळावी, यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला. आणि, ही जागा क्रीडा विभागाच्या ताब्यात वर्ग करण्यात आली. यात भेडशीतील २० वर्षांपूर्वीच्या युवा वर्गाचा मोठा वाटा आहे.
---
मंत्री केसरकरांकडून पाठपुरावा
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे स्थानिक आमदार विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करीत दोडामार्ग तालुका क्रीडा संकुल म्हणून मंजुरी मिळवत निधी मंजूर केला. निधी मंजुरी नंतरही प्रत्यक्ष कामास विलंब होत असल्याने उपसरपंच गणपत डांगी यांच्या नेतृत्वाखाली साटेली भेडशी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत याच नियोजित मैदानावर उपोषण करून लक्ष वेधण्यात आले. अशा अनेकांच्या एकत्रित प्रयत्नांतून तालुका क्रीडा संकुल इमारतीचे बांधकाम करणे, या कामाचा भूमिपूजन सोहळा आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला. याबद्दल तालुक्यातील क्रीडा प्रेमी नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT