कोकण

शैक्षणिक साहित्यांनी राजापूरमधील बाजारपेठे सजली

CD

rat7p6.jpg
07738
राजापूरः विविध पावसाळी साहित्यासह शैक्षणिक साहित्यांनी सजलेले बाजारपेठेतील दुकान.

rat7p7.jpg
07739
शालेय बॅगांनी सजलेले दुकान.

शैक्षणिक साहित्यांनी राजापूरमधील बाजारपेठे सजली
महागाईचे सावट; साहित्यांचे दर वीस-पंचवीस टक्क्यांनी वाढले
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ः येत्या काही दिवसांमध्ये शाळा सुरू होणार असल्यामुळे शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी विद्यार्थ्यांसह पाल्यांची बाजारपेठेमध्ये चांगलीच गर्दी होऊ लागली आहे. त्यासाठी विविध शैक्षणिक साहित्याने येथील बाजारपेठेतील दुकाने सजली आहेत. वाढत्या महागाईची झळ या शैक्षणिक साहित्यालाही बसली असून गतवर्षीच्या तुलनेत सुमारे वीस-पंचवीस टक्क्यांनी दर वाढले आहेत. त्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदी करताना पालकांच्या खिशाला चांगलीच चाट बसत आहे.
आठवडाभरानंतर यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. या शैक्षणिक वर्षाच्या आरंभीला शैक्षणिक साहित्याची मोठ्याप्रमाणात खरेदी होते. संभाव्य आर्थिक उलाढाल लक्षात घेऊन दुकानदारांनी विविध स्वरूपाचे शैक्षणिक साहित्य विक्रीसाठी दुकानात ठेवले आहे. दूरचित्रवाहिन्यांवरून शैक्षणिक साहित्यांच्याही जाहिराती दाखवल्या जात आहेत. त्याची क्रेझ खरेदी-विक्रीमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे अशा फॅशनबेल वस्तूंमधून मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. अशाप्रकारचे शैक्षणिक साहित्य दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यावर व्यापार्‍यांचा सद्यःस्थितीमध्ये भर असल्याचे दिसून येत आहे. शासनाकडून मोफत पुस्तके मिळतात, पण वह्या मोफत मिळत नाहीत. आवश्यक वह्यांची विद्यार्थ्यांकडून खरेदी केली जाते. विद्यार्थ्यांकडून बॉलिवूड, हॉलिवूड कलाकार, कार्टून ची आकर्षक पोझची छायाचित्र असलेली विविध कंपन्यांच्या वह्या़ंची अधिक मागणी असते. हे ओळखून व्यापार्‍यांनी अशा स्वरूपाच्या वह्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. या वह्यांच्या जोडीने विविध मैत्रीचा संदेश देणार्‍या, मुखपृष्ठावर कार्टून असलेल्या आकर्षक रंगढंगातील वह्याही विक्रीसाठी बाजरपेठेत दाखल झाल्या आहेत. 200-250 रुपयांपासून 400-450 रुपये किंमतीपर्यंत असलेल्या विविध कंपनींच्या बॅगांनी दुकाने ‘हाऊसफुल्ल’ झाली आहेत. शैक्षणिक साहित्याच्या दरामध्ये यावर्षी वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचा फटका मात्र, सर्वसामान्य पालकांना बसत आहे.

चौकट
आकर्षक वस्तूंना अधिक पसंती
गणवेश, वह्यांच्या जोडीने विविध रंगीबेरंगी आणि कंपन्यांचे रेनकोट, चप्पल, आकर्षक रंगाच्या छत्र्या, स्कूलबॅग, सॅकही बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. वॉटरप्रुफ असलेल्या स्कूलबॅगना पालकांकडून अधिक पसंती दिली जात असताना विद्यार्थ्यांकडून मात्र, विविध प्राण्यांचे आकार असलेल्या आकर्षक रंगातील बॅगांना अधिक पसंती दिली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT