कोकण

तेंडोलीत उद्या ‘राजा वीरमणी’

CD

तेंडोलीत उद्या ‘राजा वीरमणी’
कुडाळ ः तेंडोली-भोमवाडी येथे अनलादेवी कला-क्रीडा मंडळातर्फे तेथीलच अनलादेवी मंदिरात रविवारी (ता. १८) सायंकाळी साडेसातला निवडक दशावतार कलाकारांचा ‘रामाश्वमेघ’ अर्थात ‘राजा वीरमणी’ हे संयुक्त दशावतार नाटक आयोजित केले आहे. यात गणपती-नाना प्रभू, रिद्धी सिद्धी-अर्जुन राऊळ, वीरमणी-हरिश्‍चंद्र गावकर, रुक्मांगद-भरत नाईक, रुक्मावती-गोट्या येरागी, पुष्कल-दत्तप्रसाद शेणई, शत्रुघ्न-केशव खांबल, मारुती-राधाकृष्ण नाईक, सुग्रीव-सदाशिव मोडक, शंकर-अर्जुन रेडकर, वीरभद्र-विलास तेंडोलकर, नारद-सुभाष लोंढे, यज्ञपुरुष-सतीश केळुसकर यांच्या भूमिका आहेत. संगीत साथ हार्मोनियम-अमोल मोचेमाडकर, मृदंग-अर्जुन सावंत, तालरक्षक भरत लाड यांची आहे. नाट्यरसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अनलादेवी मंडळाने केले आहे.
---------------
वैश्यवाणी समाजातर्फे गुणवंतांना आवाहन
कुडाळ ः तालुका वैश्यवाणी समाजातर्फे वैश्यवाणी ज्ञातीतील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वितरण आणि शिष्यवृत्ती प्राप्त तसेच दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व सत्कार सोहळा २ जुलैला सकाळी साडेदहाला येथील महालक्ष्मी सभागृह येथे आयोजित केला आहे. तालुक्यातील वैश्य ज्ञाती विद्यार्थ्यांनी २९ जूनपर्यंत प्रत्येक गावातील ग्राम कमिटीकडे अर्ज द्यावेत. तालुक्यातील पावशी, खुटवळवाडी, खोचरेवाडी, कसाल, आंब्रड, घोटगे, जांभवडे, कुपवडे, कडावल, नेरुर, माणगाव येथील ग्राम समिती प्रमुखांनी ३० जूनपर्यंत खजिनदार विजय भोगटे (उद्यमनगर-कुडाळ) यांच्याकडे सादर करायचे आहेत. या गावांव्यतिरिक्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अर्ज सुनील धुरी (कुडाळ) यांच्याकडे द्यावेत. गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे, अशी माहिती वैश्यवाणी समाज तालुकाध्यक्षा अस्मिता बांदेकर, कार्यवाह सुचित्रा भोगटे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मे मध्ये धावणार; २३ किलोमीटरच्या मार्गिकेचे दोन टप्प्यांत उद्‍घाटन

Dharashiv Accident: तुळजापूर-लातूर महामार्गावर भीषण अपघात; तीन वाहनांची धडक, एक ठार

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Chh. Sambhajinagar: रीलस्टारनं निवृत्त प्राध्यापकाला गोळ्या झाडून संपवलं, ४० दिवसांनी उघड; कच्च्या इंग्रजीमुळे सापडले, तिघांना अटक

Pune News : पुणे महापालिकेची टीडीआर प्रक्रिया झाली सोपी

SCROLL FOR NEXT