कोकण

‘डोंगरपाल गावातील वीजप्रश्न मार्गी लावा’

CD

09797
बांदा ः महावितरणचे सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांना निवेदन देताना डोंगरपाल ग्रामस्थ.
(छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

‘डोंगरपाल गावातील
वीजप्रश्न मार्गी लावा’
बांदा ः डोंगरपाल गावात विजेचा लपंडाव सुरू असून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. गावातील समस्यांचे तातडीने निराकरण करावे, अशा मागणीचे निवेदन डोंगरपाल ग्रामस्थांनी महावितरणचे बांदा सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांना दिले. सर्व समस्यांचे तातडीने निराकारण न केल्यास स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला गावातर्फे तीव्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी धनंजय गवस, नामदेव गवस, दाजी गवस, बाळा गवस, उद्देश गवस, प्रमोद गवस, रवींद्र गवस, महेश नाईक, ज्ञानेश्वर गवस यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. अभियंता कोहळे यांनी तातडीने पाहणी करून सर्व वीज समस्या मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन दिले.
...............
09803
युवराज सावंत

‘घुसमट’चे कोल्हापुरात उद्या प्रकाशन
तळेरे : ‘स्वातंत्र्यात आम्ही कुठे?’ या बहुचर्चित आणि वाचकांनी प्रशंसा केलेल्या पहिल्या कविता संग्रहानंतर कवी युवराज सावंत यांच्या ‘घुसमट’ या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा रविवारी (ता. १८ जून) शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे आयोजित केला आहे. हा प्रकाशन सोहळा आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार राजू आवळे, विद्रोही शाहीर संभाजी भगत, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. टी. के. सरगर, प्रा. बाबुराव गुरव, कामगार नेते सुरेश केसरकर आदींच्या उपस्थितीत होणार आहे. सावंत हे माध्यमिक विद्यालय, मांगेली (ता. दोडामार्ग) येथे विद्यादानाचे कार्य करतात. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी काव्य लेखन छंद जोपासला साहित्य चळवळीत नेहमी सहभागी असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Statement : खैमेनींच्या माघारी इराणचे प्रमुख खतीबजादेह यांची जबाबदारी, शेवटची गोळीपर्यंत लढण्याचा केला निर्धार, युद्ध आणखी पेटणार

Gold Rate Today: आज सोन्याच्या भावात मोठा बदल! एक तोळा सोन्याचा भाव किती? जाणून घ्या ताजा भाव

Axar Patel: अहमदाबादमध्ये सामना? मैं हूँ ना ! अंतिम सामन्याबाबत अक्षर पटेलकडून निर्धास्त राहण्याचा दिलासा

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Success Story: गिरवीचा विशाल वाघ ठरला राज्यात अव्‍वल; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, सर्व स्तरांतून होतेय कौतुक

SCROLL FOR NEXT