कोकण

रत्नागिरी ः बंद एसटी बसेस तत्काळ सुरू करा

CD

फोटो ओळी
- rat१६p२०.jpg- KOP२३M०९७३८- रत्नागिरी ः एसटी अधिकार्‍यांशी संवाद साधनात ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी.


बंद एसटी बसेस तत्काळ सुरू करा

ठाकरे शिवसेनेचा इशारा ; एसटी प्रशासनाकडून सकारात्मक उत्तर
रत्नागिरी, ता. १६ ः शाळा, महाविद्यालये सुरू झालेली असतानाच रत्नागिरी तालुक्यातील भोके गावासह अन्य विविध गावांमधील एसटी बसेसच्या बंद फेर्‍या तत्काळ सुरू करा, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून एसटीच्या अधिकार्‍यांना देण्यात आला आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या साळवी, माजी अध्यक्ष आबा घोसाळे, उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे, विभागप्रमुख विजय देसाई, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी, सरपंच आणि शिवसैनिक यांनी विभाग नियंत्रक कार्यालयातील अधिकार्‍यांची भेट घेतली आणि तालुक्यातील बंद असलेल्या एसटीच्या फेर्‍यासंदर्भात चर्चा केली.
भोके गावातील एसटी सेवा गेले अनेक दिवस बंद होती. त्यामुळे होणारी गैरसोय तेथील ग्रामस्थांनी शिवसेना सचिव आणि खासदार विनायकराव राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तत्काळ बस सुरू करण्याबाबत लेखी सूचना एसटी प्रशासनाला केली आहे. भोके गावाबरोबर मिरजोळे, कुर्धे, मेर्वी, डोर्ले, तोणदे आदी गावातील बंद करण्यात आलेल्या एसटी फेर्‍या त्वरित चालू करण्यावर चर्चा झाली. या सर्व बसफेर्‍या सुरू करण्याचे आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिले तसेच शाळा सुटण्याच्या वेळी परतीच्या गाड्यांचे नियोजन करण्याबाबत अधिकार्‍यांनी शिवसैनिकांना सकारात्मक उत्तर दिले आहे. येत्या आठवडाभरात त्यावर कार्यवाही होईल, अशी आशा ठाकरे सेनेच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.

चौकट
पहिल्या दिवशी पायपीट
एसटी बंद असल्यामुळे पहिल्याच दिवशी गावागावातील अनेक विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागली तर काहींच्या पालकांना भूर्दंड बसला. काही पालकांनी खासगी गाडी करून पाल्यांना शाळेत पाठवले. यावरून तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT