कोकण

रत्नागिरी ः जिल्ह्यात 6 हजार 300 मेट्रिक टन खत उपलब्ध

CD

जिल्ह्यात ६ हजार ३०० टन खत उपलब्ध
सोसायटींमार्फत वितरण; पाऊस लांबल्याने पेरण्या रखडल्या
रत्नागिरी, ता. १६ ः खरीप हंगामात जिल्ह्यात शेतकऱ्यांना वेळेत खतपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभाग प्रयत्न करत आहे. जिल्ह्याला मंजूर सुमारे १२ हजार मेट्रिक टन खतसाठ्यापैकी ६ हजार ३०० मेट्रिक टन खत शासनाकडून उपलब्ध झाले आहे. ते जिल्ह्यातील विकास सहकारी सोसायटींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जात आहे.
जिल्ह्यातील एकूण खरीप पिकाखालील क्षेत्र सुमारे ८१ हजार ९९५ हेक्टर आहे. खरीप भातपिकाखालील क्षेत्र सुमारे ६८ हजार हेक्टर, नागली क्षेत्र सुमारे १० हजार २३६ हेक्टर एवढे आहे. यावर्षी २०२३-२४ च्या खरीप हंगामासाठी २१ हजार मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी सुमारे १२ हजार ७४० मेट्रिक टन खत मंजूर झाले आहे. खरीप काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत खतपुरवठा होण्यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. अजूनही पावसाला सुरवात झालेली नाही. त्यामुळे शेतीची कामे रखडली. तरीही भविष्यात खताची अडचण होऊ नये यासाठी शेतकरी खत विकत घेत आहे. आतापर्यंत रेल्वेच्या तीन रेकद्वारे टप्प्याटप्याने खत दाखल झाले. मंजूर खताच्या तुलनेत ४० टक्के खत प्राप्त झाले. हे खत प्रत्येक सोसायटीला समान वाटप करण्यात आले. तरीही अजून शेतकऱ्यांना खत पुरवठा झालेला नाही. जून महिन्यात येणारा अपेक्षित साठा जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. येत्या चार दिवसात अजून एक मोठी खताची रेक दाखल होणार आहे. त्यामधून सुमारे दीड हजार मेट्रिक टन खत जिल्ह्याला मिळेल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, प्रत्येक वर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर खतटंचाईला सामोरे जावे लागते. युरिया व डीएपीचा बफर स्टॉक करण्यावर भर दिला आहे. खतांची कमतरता खरोखरच भासू लागल्यास हा बफर स्टॉक खुला केला जाणार आहे.

कोट
शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून विक्री होणाऱ्या बियाणे, खते, कीटकनाशकांचा दर्जा, भेसळ यांची तपासणी केली जाते. निविष्ठांची अनधिकृत साठवणूक करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका कार्यक्षेत्रात भरारी पथकं स्थापना केली आहेत. तसेच जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती कार्यरत आहे.
- अजय शेंडे, कृषी विकास अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Gas Connection : गॅस सिलिंडरचं टेन्शन मिटलं ! आता २४ तासांत मिळेल PNG कनेक्शन, घरबसल्या 'असा' करा अर्ज

RCB चा माजी खेळाडू झाला पुन्हा बाबा; दोन जुळ्या मुलानंतर घरी आली परी

Hindu Nav Varsh: असा मराठी राजा, ज्याचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारण्याच्या प्रथेला झाली सुरुवात; जाणून घ्या इतिहास

Latest Marathi News Live Update : डोणगावमध्ये खंडोबा मंदिरावर वीज कोसळली

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT