कोकण

जिल्ह्यात अमली पदार्थ जनगृती सप्ताहाचे आयोजन

CD

09815
जिल्ह्यात अमली पदार्थ जनगृती सप्ताहाचे आयोजन

पोलिस अधीक्षक; सोमवारपासून तालुकानिहाय विविध उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १६ ः अमली पदार्थांचे सेवन ही एक गंभीर समस्या बनली आहे. अमली पदार्थांमध्ये कोकेन, ब्राऊन शुगर, हेरोईन चरस, एलएसडी, एमडीएमए, एमडीए, एसटीपी, मेफेड्रोन आदी प्रमुख पदार्थांचा सामावेश होतो. अमली पदार्थांच्या सेवनामुळे गंभीर स्वरुपाचे आजार उद्भवतात, तसेच पिढीही बरबाद होते. हे टाळण्यासाठी अमली पदार्थ सेवन करू नये, यासाठी पोलिस विभागातर्फे १९ ते २६ जून या कालावधीत अमली पदार्थ जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.
अमली पदार्थांच्या उत्पादन, विक्री, वाहतूक सेवन यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने १९८५ मध्ये गुंगीकारक पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यांना प्रतिबंध करणारा कायदा अंमलात आणला. अमली पदार्थांच्या सेवनामुळे मृत्यू, आरोग्य ढासळणे, हृदयाची स्पंदने वाढणे, झोप न येणे, बेशुध्द होणे, नाकातून रक्त येणे, श्वसनाचा त्रास होणे, दात शिवशिवणे, शरीर थरथर कापणे इत्यादी गंभीर परिणाम माणसाच्या शरीरावर होतात. काही अमली पदार्थांचे रुग्ण आत्महत्येलाही प्रवृत्त होतात. तरुणांनी कॉलेज जीवनाचा आनंद घेणे, थ्रील अनुभवणे यासाठी अमली पदार्थांच्या मार्गाचा अवलंब करू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी केले.
अमली पदार्थ सेवनामुळे होणारे परिणाम हे सेवन करणाऱ्या व्यक्तीबरोबर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला भोगावे लागतात. पर्यायाने त्या पिढीवर कायमस्वरुपी गंभीर परिणाम होऊन ती पिढी बरबाद होते. तरुणांनी व नागरिकांनी अमली पदार्थांच्या आहारी न जाता प्रत्येकाने चांगल्या सवयी अंगीकाराव्यात. काही वेळा प्रलोभनामुळे तरुण पिढी अमली पदार्थ घेण्याकडेही वळते; मात्र त्यामुळे त्या तरुणांचे आयुष्य बरबाद होते. त्यामुळे अमली पदार्थांच्या वापरास आळा घालण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिस दल व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २६ जून या कालावधीत पोलिस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कालावधीत शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी कार्यशाळा आयोजन या दिनाचे औचित्य साधून ज्युनिअर कॉलेज, सीनियर कॉलेज, मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज येथील प्राध्यापक, मुले, पत्रकार, सामाजिक स्वंयसेवी संस्था, वकील, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या सहभागातून ‘ड्रग फ्री इंडिया’ (DRUG FREE INDIA) अभियान यशस्वी होण्यासाठी जनजागृतीकरिता पथनाट्य, ढोल पथक, अमली पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांच्या बॅनरसह रॅली, शाळा व सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था या ठिकाणी स्वतंत्र कार्यशाळा असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
२६ जूनला डीपीडीसी हॉल येथे एनडीपीएस, कायदा, व्यसनमुक्ती व अमली पदार्थ या विषयावर १० ते १ वाजेपर्यंतच्या दरम्यान मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलिस स्टाफ, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद स्टाफ उपस्थित राहणार आहे. या कालावधीत अमली पदार्थ विरोधी मोहीम राबविण्यासाठी सर्व पोलिस ठाणे अधिनस्थ स्वतंत्र पथक निर्माण करून अमली पदार्थ विक्रेते, वाहतूक करणारे, अमली पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळवून प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे. आरोपीकडून ताब्यात मिळालेला अमली पदार्थ कोठून, कोणत्या मार्गाने, कोणत्या प्रकारे, कोणाकडून घेण्यात आला व तो पुढे कोणाला देणार होता, याबाबतची साखळी शोधून त्याचे मुख्य स्रोत शोधून अमली पदार्थांच्या साठ्यांचा समूळ नायनाट करण्यात येणार आहे. अमली पदार्थ तसेच विक्री करणारे, सेवन करणारे किंवा त्यांच्याशी संबंधित उपयुक्त माहिती असेल्यास तत्काळ नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग किंवा संबंधित पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना कळवावी, जेणेकरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
.............
चौकट
असे आहे नियोजन
वेंगुर्ला, निवती पोलिस ठाणे- १९ जून, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ- २० जून, मालवण, आचरा- २१ जून, सावंतवाडी, बांदा, दोडामार्ग- २२ जून, कणकवली, वैभववाडी- २३ जून, देवगड, विजयदुर्ग- २४ जून.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: शिर्डीच्या प्राईम भूखंडावर घाईघाईने गव्हाची कापणी! कॅप्टन खरातच्या अफाट संपत्तीचे धक्कादायक रहस्य उघड... कुठे किती संपत्ती?

Nashik Temple Theft : देवही सुरक्षित नाहीत! सातपूरमधील ३ मंदिरांच्या दानपेट्या फोडणारा चोरटा गजाआड

PNG Gas Connection : गॅस सिलिंडरचं टेन्शन मिटलं ! आता २४ तासांत मिळेल PNG कनेक्शन, घरबसल्या 'असा' करा अर्ज

RCB चा माजी खेळाडू झाला पुन्हा बाबा; दोन जुळ्या मुलानंतर घरी आली परी

Hindu Nav Varsh: असा मराठी राजा, ज्याचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारण्याच्या प्रथेला झाली सुरुवात; जाणून घ्या इतिहास

SCROLL FOR NEXT