कोकण

प्राणीगणनेत कोळकेवाडी धरणावर आढळला बिबट्या

CD

पौर्णिमेच्या प्राणीगणनेत आढळले ९९ प्राणी

- कोळकेवाडी धरणावर आला बिबट्या
- रानडुक्कर, गवे, माकडांची संख्या अधिक
- १६ प्रकारच्या प्राण्यांचा मुक्त संचार

मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः रत्नागिरी जिल्हा वनसंपदेने नटलेला आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्र वन्यप्राण्यांसाठी सुरक्षित मानले जाते. येथील जंगलात वन्यप्राण्यांचा संचार आहे. बौद्ध पौर्णिमेच्या रात्री वनविभागाकडून जिल्ह्यात १५ ठिकाणी प्राणीगणना करण्यात आली. या गणनेत ९९ प्राणी मुक्त संचार करताना आढळले. त्यात माकड, गवा आणि रानडुकरांची संख्या जास्त आहे. प्राणीगणनेत एकमेव कोळकेवाडी धरणावर बिबट्या आढळला.
बौद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री म्हणजे ५ आणि ६ जानेवारीला प्राणीगणना करण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला होता. उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटतात आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होतो. अशा वेळी जिथे पाणी तिथे प्राणी आवर्जून जातात. बौद्ध पौर्णिमा ही उन्हाळ्यातील सर्वाधिक प्रकाश असलेली रात्र असते. त्यामुळे जंगलातील सर्व प्राणी पाणवठ्यावर येतील या हिशोबाने वनकर्मचारी सायंकाळपासून पाणवठ्यावर मुक्काम ठोकून होते. १५ ठिकाणी १६ प्रकारचे प्राणी पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर आल्याचे आढळून आले. आंबतखोल हडकणी धरणावर प्राणी निरीक्षणाचा अनुभव कथन करताना वनपाल उमेश अखाडे म्हणाले, यावर्षी स्वच्छ हवामान राहिल्याने चंद्राच्या लख्ख प्रकाशात वन्यप्राण्यांचे दर्शन झाले. ३ माकडांचे टोळके धरणावर आले. मिनिटात पाणी पिऊन निघून गेले. सूर्यास्त होता होता माकडे पाणी पिऊन जातात ती पुन्हा सकाळी येतात, हे मला पहिले वाचल्याचे लगेच आठवले.
विभागीय वनाधिकारी दीपक खाडे म्हणाले, मी आणि वनपाल डी. आर. भोसले कोळकेवाडी धरणावर निरीक्षणासाठी थांबलो होतो. अंधार पडू लागला होता. काय काय दिसणार याचा अंदाज घेत बसलो होतो. इतक्यात भोसले यांनी हम्म असा आवाज काढला. बिबट्या आसपास असल्याची ती खूण होती. काही क्षणातच बिबट्या आला आणि पाणी पिऊन निघून गेला.


निरीक्षण केलेली ठिकाणे
नांदगाव - आंबतखोल हडकणी धरण, रानवी- तळवली धरण, अडूर- पिंपर धरण, आबलोली- कोतळूक धरणाचे पाणी, कोळकेवाडी- कोळकेवाडी धरण, देव्हारे- तुळशी धरण, बांधतिवरे- शिवाजी नगर, तळे- घेरारसाळगड, राजापूर- कावतकर, आरवली- पाझर तलाव, फुणगुरा- बागी धरण, कोले- खोरनिनको धरण, लांजा- कुर्णे पाणवठा, रत्नागिरी- कशेळी वळवणे

चौकट
वन्यजिवांची आढळलेली संख्या
रानडुक्कर- २५
भेकर- ४
कोल्हे- ७
सांबर- २
उदमांजर- ४
गवा- १९
बिबट्या-१
ससा- ५
बगळा- १
खंड्यापक्षी- १
मोर- १
साळिंदर- २
कोळशिंदे- ४
मगर- २
कांडेचोर- १
माकड- २०
एकूण- ९९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT