कोकण

दापोलीत शिकारीसाठी आलेल्या चौघांना अटक

CD

पान १ साठी


दापोलीत शिकारीसाठी आलेल्या चौघांना अटक
१२ बोअरची रायफल, १५ जिवंत काडतुसे जप्त; तिघे ठाणे, भिवंडीचे
दाभोळ, ता. १८ : दापोली तालुक्यातील जंगलातील वन्यजीवी प्राण्यांची अवैध शिकार करण्यासाठी आलेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १२ बोअरची रायफल व १५ जिवंत काडतुसांसह एक मोटार असा एकूण ३ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १७ जूनला मध्यरात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले. यात रेकॉर्डवरील गुन्हेगार, हॉटेल्स, लॉज, संशयित वाहने आदींची तपासणी केली. दरम्यान, वन्यजीव प्राण्यांची अवैध शिकार करणारी टोळी वाहनासह फिरत असल्याची गोपनीय माहिती खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांना मिळाली.
राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली एक पोलिस पथक तयार करण्यात आले. हे पथक जंगलमय भागात गस्त घालत असताना पहाटे तीन वाजता मौजे दळखण या ठिकाणी एक संशयास्पद मोटार अंधाराचा फायदा घेत वेगाने पुढे जाताना आढळून आली. या वाहनाच्या टपावर दोघेजण बसलेले होते. पैकी एकाकडे एक बंदूक होती. पथकातील पोलिसांनी ही गाडी थांबवून त्यांची झडती घेतली असता त्यात १२ बोअरची १५ जिवंत काडतुसे मिळाली. या झडतीमध्ये ३ लाख ३ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी अक्षय बळिराम नागळकर (घोडबंदर रोड, भाईंदर, ठाणे), योगेश विठ्ठल तुरे (टाळसुरे, ता. दापोली), सचिन कचेर पाटील (दापोडे, ता. भिवंडी), करण ऊर्फ बंटी शिवाजी ठाकूर (भिवंडी) यांना अटक केली आहे. त्यांच्यावर दापोली पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३(२५) अन्वये गुन्हा दाखल आला आहे. या मोहिमेत दापोली पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक गंगधर, चालक एम. एच. केतकर, विनय पाटील, खेड पोलिस ठाण्यातील कर्मचारी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT