बावनकुळे  esakal
कोकण

Chiplun : निवडणूक प्रमुख हेच भाजपचे भविष्यातील उमेदवार, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची मोठी घोषणा

निवडणुकीचे उमेदवारही भाजपने जवळपास निश्चित केले आहे.

राजेश नागरे

चिपळूण : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जबाबदारी दिलेले निवडणूक प्रमुख हेच उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे येथे केली. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख प्रमोद जठार हे संभाव्य उमेदवार असतील, हे आता स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीचे उमेदवारही भाजपने जवळपास निश्चित केले आहे.

महाराष्ट्रात भाजपला शिवसेना युतीचा घटक पक्ष म्हणून हवा आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांची मतेही हवी आहेत; परंतु २०२४ च्या निवडणुकीत भाजपला स्वपक्षाचे चारशेहून अधिक खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी देशातील मोठ्या राज्यांमध्ये जिथे जिथे शक्य आहे तेथून पक्षाचे उमेदवार देण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. अर्थातच, भाजपच्या या कृतीमुळे मित्रपक्ष दुखणारा असला तरी देशपातळीवर आणि राज्यपातळीवर जागावाटपात भाजप समन्वय साधेल, असे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.

भाजप शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. उमेदवारीबाबत भाजपमध्ये बंद दाराआड चर्चा होते. पक्षाने अपेक्षित उमेदवार दिला नाही तर कार्यकर्ते जाहीर नाराजी व्यक्त करत नाही. शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष असा प्रवास करणारे माजी खासदार नीलेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती; परंतु मागील दोन वर्ष राणे यांच्यापेक्षा प्रमोद जठार यांचे दौरे मतदार संघात वाढले आहेत.

खरंतर हा मतदार संघ मिळवण्यासाठी भाजपला तगड्या उमेदवाराची गरज आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा भाजपसमोर पर्याय आहे; परंतु त्यांची खासदारकी अजून दोन वर्षे शिल्लक आहे. नीलेश राणे विधानसभेत जाण्यासाठी कणकवली मतदार संघातून इच्छुक आहेत, ही बाब जठार यांच्या पथ्थ्यावर पडणार आहे. रत्नागिरी आणि गुहागर या दोन्ही पारंपरिक मतदार संघात भाजपने जुन्या लोकांवर जबाबदारी दिली आहे. चिपळूण, राजापूर आणि दापोली मतदारसंघातही भाजपने निवडणूक प्रमुखांची निवड करून इच्छुकांना कामाला लागण्याचे संकेत दिले आहेत.

आगामी निवडणुकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळवणे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचा सपाटून पराजय हे दोन उद्दिष्ट भाजपसमोर असणार आहेत. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बरोबर न घेता कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांसमोर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार देण्याची चाल भाजप करू शकते.

विरोधकांनी कितीही आरोप-प्रत्यारोप केले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने प्रगती केली आहे. देशाची आर्थिक व्यवस्था अधिक सक्षम झाली आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- विनय नातू, माजी आमदार, गुहागर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT