Bhaskar Jadhav and Sunil Tatkare on one status in chiplun
Bhaskar Jadhav and Sunil Tatkare on one status in chiplun Sakal
कोकण

Raigad: बंडानंतर चित्र पालटले ! सुनील तटकरे विरूद्ध भास्कर जाधव पुन्हा रंगणार सामना

मुझफ्फर खान

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात महत्वाची भूमिका बजावणारे खासदार सुनील तटकरे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप, शिंदे गट शिवसेना, राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी फुटण्यापूर्वीच आमदार भास्कर जाधव यांनी रायगडमध्ये जाऊन ठाकरे गटाच्या शिवसेनेचा मेळावा घेतला आणि विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला होता. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता भविष्यात लोकसभेला तटकरे विरुद्ध जाधव हे पारंपरिक राजकीय विरोधक पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना, शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संघटन मजबूत आहे. दापोली, गुहागर, महाड, श्रीवर्धन, पेण आणि अलिबाग असे सहा आमदार या मतदारसंघात येतात.

दापोलीचे योगेश कदम, महाडचे भरत गोगावले आणि अलिबागचे महेंद्र दळवी हे शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार आहेत. पेणचे रवींद्र पाटील भाजप, श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे फुटलेली राष्ट्रवादी आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आहेत. त्यामुळे विद्यमान सरकारचे रायगड लोकसभा मतदारसंघात संघटन मजबूत आहे.

या मतदात संघात राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्यापूर्वी धैयेशील पाटील यांचे नाव भाजपकडून लोकसभसाठी आघाडीवर होते. धैर्यशील पाटील यांचा शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यांचे वडील मोहन पाटील पेण मतदार संघात आठवेळा आमदार होते.

त्यामुळे पाटील हे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना आव्हान देऊ शकतात, असे चित्र होते; मात्र राष्ट्रवादीचा एक गट भाजपच्या सरकारमध्ये सामील झाल्यामुळे विद्यमान खासदार तटकरे यांचेही नाव पुढे येत आहे. त्यामुळे लोकसभेसाठी विद्यमान सरकारकडून पाटील की तटकरे याची सर्वांना उत्सुकता आहे.

केवळ पक्षाचा आदेश म्हणून सुनील तटकरे यांनी दोनवेळा लोकसभेची निवडणूक लढवली होती; मात्र त्यांचे लक्ष नेहमीच राज्याच्या राजकारणात होते. तटकरेंची भक्कम साथ मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी फोडता आली. तटकरेंच्या बंडानंतर रायगड जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे पाय अधिक खोलात गेले आहेत.

गुहागरचे आमदार शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यावर या मतदार संघाची मदार आहे. सहापैकी विधानसभेच्या पाच मतदार संघावर विद्यमान सरकारचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीमध्ये भास्कर जाधव लोकसभेची निवडणूक लढवतील किंवा नाही हे अनिश्चित आहे; मात्र तटकरे विरुद्ध जाधव हा सामना पुन्हा पाहायला मिळणार आहे.

नेते गेले; पण जे नेते जन्माला घालणारे लोक आहेत ते महाविकास आघाडीसोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी मजबूत आहे. या वेळी शरद पवारसाहेबांचा पवित्रा आक्रमक आहे. ते या आमदारांवर पांघरूण घालणार नाहीत किंबहुना त्यांना पांघरूणाखाली ठेवतील, असे दिसते. आमदार किती येतील ते माहीत नाही; पण येथे लांडगा आला रे आला असे आता या वेळी चालणार नाही. याही वयात मी तुम्हाला पुरून उरेन, असा त्यांचा पवित्रा दिसतो हे विशेष.
- भास्कर जाधव, शिवसेना नेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुख्यमंत्री शिंदेंच्या गडात सर्वात कमी मतदान? जाणून घ्या ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT