कोकण

कुडाळात विद्यार्थ्यांतर्फे वनमहोत्सव

CD

14761
कुडाळ ः वनमहोत्सव उपक्रमात सहभागी विद्यार्थी.

कुडाळात विद्यार्थ्यांतर्फे वनमहोत्सव
कुडाळ ः कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सव झाला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. ‘वृक्षांचे महत्त्व’ यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. शिक्षकांनी मुलांना वृक्ष लागवडीबाबत माहिती दिली व वृक्षारोपणासाठी प्रोत्साहित केले. यानिमित्त चित्रकला, घोषवाक्य व वृक्षांचे महत्त्व सांगणाऱ्या स्वरचित कवितांचेही सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षकांकडून शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमास विद्यार्थी व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख यांनी दिली.
................
‘तिलारी पाटबंधारे’ अभियंतापदी जाधव
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम तिलारी-चराठेचे कार्यकारी अभियंता म्हणून विनायक जाधव यांनी पदभार स्वीकारला. तर रोहित कोरे यांची सांगली येथे बदली झाली आहे. सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम कार्यकारी अभियंता कोरे यांची ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्प, सांगली येथे त्याच पदावर बदली झाली आहे. तर अलोरे-रत्नागिरी येथे गुण नियंत्रण कार्यकारी अभियंता म्हणून पदभार सांभाळणारे जाधव यांनी सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम कार्यकारी अभियंता म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी पूर्वी तिलारी आंतरराज्य जलविद्युत प्रकल्पात कोनाळकट्टा येथे काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maoist Encounter : एक कोटींपेक्षा अधिकचा इनाम असलेला माओवादी लीडर गणेश उईकेसह सहा जण चकमकीत ठार!

Virar Municipal Election : बहुजन विकास आघाडीतून सत्तेसाठी आलेल्याना तिकीट देऊ नका; भाजपाच्या जेष्ठ नेत्यांचा नेतृत्वाला इशारा

Latest Marathi News Live Update : हिंदूंच्या घरांवर हल्ला करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना बांगलादेश पोलिसांनी बक्षीस जाहीर केले

MPSC Exam Update: MPSC कडून उत्तरपत्रिकेची नवी रचना जाहीर; जाणून घ्या काय बदलले आहे

Vaibhav Suryavanshi ने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून अचानक घेतली माघार; रेकॉर्ड ब्रेकिंग खेळीनंतर 'या' कारणामुळे सोडली स्पर्धा

SCROLL FOR NEXT