कोकण

संक्षिप्त

CD

फोटो ओळी
-rat10p10.jpg ःP23M15172Ø लांजा ः आमदार राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त वेरळ येथे वृक्षारोपण करताना आमदार राजन साळवी.

वेरळला शिवसेनेतर्फे वृक्षारोपण
लांजा ः आमदार राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त वेरळ शिवसेनेच्या वतीने श्री साईबाबा मंदिर येथे अभिषेक, पूजा आणि वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शिवसेना शाखेच्यावतीने माजी सभापती दीपाली साळवी यांच्या नेतृत्वाखाली श्री साईबाबा मंदिरात अभिषेक आणि पूजा‌ करून आमदार साळवी यांना उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या वेळी प्रमोद पाध्ये, विभागप्रमुख शरद चरकरी, ‌शाखाप्रमुख महेश गुंडये, युवा‌नेते जयवंत साळवी, साईबाबा मंदिराचे अध्यक्ष विष्णू चव्हाण, सदानंद चरकरी, रवींद्र साळवी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. त्यानंतर आमदार साळवी यांनी वृक्षारोपण केले.


फोटो ओळी
- rat10p13.jpg ःKOP23M15181 साखरपा ः साहित्य वाटप करताना मान्यवर आणि शिक्षकवृंद.

किरबेट शाळा नं. 1 मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
साखरपा ः किरबेट नं. 1 मध्ये शाळेत वह्या वाटप समारंभ झाला. साखरपा येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने हे वाटप करण्यात आले. किरबट गाव आणि परिसर हा दुर्गम आहे. येथील विद्यार्थ्यांची आणि पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेत साखरप्यातील सामाजिक कार्यकर्ते व किरबेट ग्रामस्थांच्यावतीने शाळेतील मुलांसाठी वह्या वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिकून समाजात आदर्श नागरिक म्हणून पुढे यावे अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. त्याकरिता सर्वतोपरी लागेल ते साहाय्य करण्याचे अभिवचन मान्यवरांनी दिले. या समारंभात शा. व्य. स. अध्यक्ष सचिन अंकुशराव, उल्का विश्वासराव, अमित केतकर, श्रीधर कबनूरकर, अविनाश कदम, वंदना जायगडे, दत्ताराम निंबाळकर, संतोष चव्हाण, मुख्याध्यापिका दिव्या भाटकर, तृप्ती सुर्वे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षिका सुवर्णा पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले.
------

फोटो ओळी
-rat10p15.jpg ः M15183
स्वरांगी पांचाळ


स्वरांगी पांचाळचे चित्रकलेत यश
लांज ः जिल्हा परिषद रत्नागिरी, प्राथमिक शिक्षण विभाग व जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारीमध्ये राबवण्यात आलेल्या शोध कलारत्नांचा या उपक्रमांतर्गत घेतल्या गेलेल्या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये गट ड (9वी ते 12वी) या गटातून तळवडे येथील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी स्वरांगी पांचाळ हिने सुयश प्राप्त केले आहे. तिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक-शिक्षकेतर, कर्मचारी वर्ग तसेच पालक या सर्वांनी तिचे हार्दिक अभिनंदन केले.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT