कोकण

६० टक्‍के दिव्यांग प्रमाणपत्रांविना

CD

17052
कणकवली : एकता दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागनाथ धर्माधिकारी यांना निवेदन दिले.

६० टक्‍के दिव्यांग प्रमाणपत्रांविना

‘एकता दिव्यांग’ची खंत; कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयाबाबत सुविधा द्या

कणकवली, ता.१८ : कणकवली, वैभववाडी, देवगड या तीन तालुक्‍यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयातून दिले जावे. कारण ६० टक्के दिव्यांगांकडे प्रमाणपत्रे नाही, अशी खंत एकता दिव्यांग विकास संस्थेने व्यक्त केली. याबाबतचे निवेदन कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांना देण्यात आले.
एकता दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांची भेट घेतली. यावेळी त्‍यांना कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयातूनच दिव्यांग प्रमाणपत्र देण्याबाबतची मागणी करण्यात आली.
सुनील सावंत म्‍हणाले, कणकवली, वैभववाडी आणि देवगड तालुक्‍यातील ६० टक्‍के दिव्यांगांकडे अद्यापही प्रमाणपत्र नाही. दिव्यांगांना प्रमाणपत्र काढण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्‍हा रूग्‍णालयात जावे लागते. हे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी किमान तीन फेऱ्या माराव्या लागतात. सिंधुदुर्ग शासकीय रूग्‍णालयात जा-ये करण्यासाठी दिव्यांगांना एक दिवस लागतो. त्‍यामुळे तीनवेळ जाणे-येणे दिव्यांगांना शक्‍य होत नाही. त्‍यामुळे कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात तीन तालुक्‍यांसाठी प्रमाणपत्राची उपलब्‍ध होणे आवश्‍यक आहे.
---
परिष्ठांशी पत्रव्यवहार करण्याची ग्वाही
डॉ. नागनाथ धर्माधिकारी म्‍हणाले, दिव्यांग बांधवांना कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात प्रमाणपत्र मिळण्याबाबत आम्‍ही वरिष्‍ठ कार्यालयाशी तातडीने पत्रव्यवहार करणार आहोत. तसेच वरिष्‍ठांनी आदेश दिले तर कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही देखील होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT