कोकण

किशोरवयीन मुलांसाठी अतिरिक्त आहार योजना

CD

माहितीचा कोपरा

swt३१८.jpg
M२०१०४
विनोद दळवी

किशोरवयीन मुलांसाठी
अतिरिक्त आहार योजना

लीड
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी अतिरिक्त आहार योजना राबविण्यात येत आहे. कुपोषित मुले-मुली, किशोरवयीन मुली, गरोदर व स्तनदा माता यांच्यासाठी ही योजना राबविण्यात येत असून, कुपोषित मुलांतील शाकाहारी असलेल्या मुलांसाठी दिवसाला दोन याप्रमाणे केळी, तर मांसाहारी असलेल्या मुलांना दिवसाला एक याप्रमाणे अंडे आठवड्यातून सहा दिवस पुरविण्यात येणार आहे.
- विनोद दळवी
..............
अंगणवाडी क्षेत्रातील ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांना स्थानिक परिस्थितीनुसार आठवड्यातून सहा दिवस हा आहार पुरविण्यात येणार आहे. यासाठी अंगणवाडी सेविका स्वतः बाजारभावाने मुलांच्या संख्येच्या प्रमाणात शाकाहारी मुलांना दोन केळी तसेच मांसाहारी मुलांना एक अंडे उपलब्ध करून देणार आहेत. यासाठी दिवसाला एका लाभार्थीमागे सहा रुपये खर्च केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे गरोदर व स्तनदा माता यांना गरोदरपण ते प्रसूतीनंतर सहा महिने या कालावधीत बाळंत विडा वितरित केला जातो. या बाळंत विड्यामध्ये पोषक सुका मेवा व प्रथिनयुक्त आहाराचा समावेश आहे. हा आहार गरोदर व स्तनदा माता यांना अतिरिक्त पोषण आहार म्हणून पुरविला जाणार आहे.
...............
* दहा लाख रुपयांची तरतूद
जिल्हा परिषदेने कुपोषित मुले-मुली, किशोरवयीन मुली, गरोदर व स्तनदा माता यांच्यासाठी सुरू केलेल्या या योजनेसाठी दहा लाख रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केली आहे. यासाठी लागणारा निधी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाकडून तालुका पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. तेथून हा निधी तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातून अंगणवाडी सेविकांच्या खात्यात वर्ग करणार आहे. आठवड्यात झालेल्या खर्चाला मान्यता घेऊन तेवढा निधी अंगणवाडी सेविका खात्यातून काढणार आहे. याचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकेची राहणार आहे.
................
* सायकलसाठी साडेपाच लाखांची तरतूद
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना सायकल पुरविणे या योजनेसाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षात साडेपाच लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. ग्रामीण भागातील मुलींना घर ते शाळा यामध्ये दोन किलोमीटर अंतर असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ग्रामीण मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी घर ते शाळा ये-जा करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. एखादी विद्यार्थिनी रेल्वे, बसने प्रवास करून शाळेत जात असेल आणि रेल्वेस्थानक किंवा बस थांबा ते शाळा हे अंतर दोन किलोमीटर असल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. एकाच कुटुंबातील दोन मुली वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत असतील आणि निकषात बसत असतील, तर त्यांनाही लाभ दिला जाणार आहे. एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन जणांना एकावेळी लाभ दिला जाणार आहे.
..................
कोट
कुपोषित मुले, गरोदर माता, स्तनदा माता यांना अतिरिक्त पोषण आहार पुरविणे आणि पाचवी ते बारावीपर्यंतच्या दारिद्र्य रेषेखालील मुलींना सायकल पुरविणे या दोन योजना जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविल्या जात आहेत. यातून कुपोषित मुले, गरोदर आणि स्तनदा माता यांच्या सुदृढतेची काळजी घेण्याचा तसेच मुलींना शाळेत ये-जा करण्यासाठी सायकल सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. याचा लाभ पात्र महिला व मुलींनी घ्यावा.
- संतोष भोसले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास विभाग
..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंचे आदेश मनमानी करणारे अन् एकतर्फी, FDA कारवाईविरोधात हायकोर्टात याचिका दाखल

Gold Rate Today: 2 दिवसांच्या तुफान वाढीनंतर सोनं घसरलं! महाराष्ट्रात आज 24, 22 आणि 18 कॅरेटचा भाव किती?

Latest Marathi Live Update: राष्ट्रीय कामाच्या नावाखाली शिक्षकांवर वाढता ताण; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम

Buddha Vihar Fund Controversy : थिबाराजाकालीन बुद्धविहारासाठी मंजूर झालेल्या कोट्यवधींच्या निधीवरून पेटला वाद; थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?

Koyna Dam Water Storage Latest Update : कोयना धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली! येत्या काही दिवसांत विसर्ग? महाबळेश्वरसह नवजात धुवांधार पाऊस, पाहा आजचा पाणीसाठा

SCROLL FOR NEXT