-rat७p९.jpg-२३M२१७३६ राजापूर ः गणेशमूर्ती रंगवताना मूर्तिकार दीपक खांबल.
गणेशमूर्तीसाठीच्या साहित्यात वीस टक्के वाढ
महागाईचा फटका ; मूर्तींच्या किंमती वधारणार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ ः सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांचे यंदा अधिक महिन्यामुळे १९ दिवस उशिराने आगमन होणार आहे. सुमारे दीड महिन्यांनी घरोघरी गणराय विराजमान होणार असले तरी गणेशमूर्ती घडवण्यासाठी कार्यशाळांमध्ये लगबग सुरू आहे. वाढत्या महागाईमुळे गणेशमूर्ती तयार करण्याच्या साहित्यामध्ये सुमारे वीस टक्के वाढ झाल्याने त्याचा सामना मूर्तिकारांसह गणेशभक्तांनाही करावा लागणार आहे.
तालुक्यामध्ये लहान-मोठ्या अशा हजारो गणेशमूर्तींसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येही गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना दरवर्षी केली जाते. श्रीगणेशाच्या स्वागतासाठी नेमकी आरास कशा पद्धतीची आणि कोणती करायची याचे नियोजन आणि आराखडे तयार करण्यालाही सुरवात झाली आहे. गेल्या महिन्यात सुरू झालेल्या अधिक महिन्यामुळे दीड महिन्यांनी गणेशोत्सवाचे आगमन होणार आहे. गणेशचित्रशाळांमध्ये मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे.
गणेशमूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या शाडूच्या मातीसह रंग आणि साहित्य आदींच्या दरामध्ये वाढ झाली आहे. मूर्ती तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेली शाडूची माती कोकणामध्ये मिळत नसून परराज्यातून विकत आणावी लागते. सर्वसाधारणपणे ही माती किलोवर खरेदी न करता पोत्यावर केली जाते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रत्येक पोत्याच्या किंमतीमध्ये ३०-३५ रुपयांची वाढ झाली आहे. वाढलेला वाहतूक खर्च आणि गणेशमूर्ती तयार करण्यासाठी अन्य लागणार्या साहित्याच्या वाढलेल्या किंमती, कारागारांची वाढलेली मजुरी या सार्या स्थितीमध्ये गणेशशाळा चालवणे आणि गणेशमूर्ती तयार करणे कारखानदारांना डोईजड झाले आहे. त्याचा परिणाम गणेशमूर्तींच्या किंमतीत वाढणार आहेत. गणेशमूर्तींसह गणेशोत्सवासाठी लागणार्या अन्य वस्तूंचे दरही वाढले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना वाढत्या महागाईचा चांगलाच सामना गणेशोत्सवात करावा लागणार आहे.
-----------
पॉईंटर ः
शाडूच्या मातीच्या दरात वाढ
वाहतूक खर्चात वाढ
अन्य साहित्याच्या किंमतीही वाढल्या
कारागारांची मजुरी वाढली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.