23871
मठ ः दशावतार लोककला प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
दशावतार प्रशिक्षण शिबिरास
मठ येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
वेंगुर्ले, ता. १८ ः ‘प्रवास दत्तमाऊलीचा, सोहळा त्रैवर्ष पूर्तीचा’ अंतर्गत दत्तमाऊली पारंपरिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशीय मंडळातर्फे रविवारी (ता. १३) मठ येथील स्वयंभू मंगल कार्यालयात एकदिवसीय दशावतार प्रशिक्षण शिबिर झाले. यावेळी प्रमुख पाहुणे सिंधुदुर्ग भजन संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर होते. दशावतार कला जोपासण्यासाठीची तपश्चर्या असामान्य आहे. दशावतार प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे ही काळाची गरज आहे. अशाच प्रशिक्षण शिबिरांमधून दशावतार कलेला वारसा मिळून देणारे दर्जेदार कलावंत निश्चितच घडतील. दशावतार कलेसोबत भजनकलेलाही राजाश्रय मिळवून द्यायचा असल्यास सर्व कलावंतांनी संघटित होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यात सहभागी ३० प्रशिक्षणार्थींना दामू जोशी, पपू नांदोसकर, यशवंत तेंडोलकर, प्रशांत मेस्त्री, आनंद नार्वेकर, पंढरीनाथ घाटकर, पपू घाडीगावकर, चंद्रकांत खोत, हरेश नेमळेकर आदींनी भूमिकेतील बारकावे, प्रसंग, अभिनय, वेशभूषा, प्रसंगानुरूप सादरीकरण आणि सादरीकरणातील छोट्या-छोट्या त्रुटी याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला वाहतूक पोलिस अंमलदार मनोज परूळेकर, गौरव परब यांच्यासह ज्येष्ठ दशावतार कलाकार रवी खानोलकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.