

Ajinkya Rahane
Sakal
IPL 2026, CSK vs KKR Marathi news: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स संघ सध्या संघर्ष करताना दिसत आहे. पहिल्या ५ सामन्यानंतरही अद्याप कोलकाताने एकही सामना जिंकलेला नाही. मंगळवारी (१४ एप्रिल) झालेल्या सामन्यात कोलकाताला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
५ सामन्यांतील कोलकाताचा हा चौथा पराभव होता. त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. आता चेन्नई विरूद्धच्या पराभवानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) दुहेरी कात्रीत सापडला असून त्याच्यावर बीसीसीआयकडूनही (BCCI) कारवाई झाली आहे. या सामन्यानंतर रहाणेवर दंडात्मक कारवाई झाली, याची माहिती आयपीएलकडून देण्यात आली आहे.