कोकण

सावंतवाडीकरिता नव्या बस उपलब्ध करा

CD

सावंतवाडीकरिता नव्या बस उपलब्ध करा
वसंत केसरकरः उपलब्ध बसेस कालबाह्य
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ः जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या बसेस जुन्या व कालबाह्य झाल्या आहेत. अशा बसेस वापरात असल्यामुळे त्या रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा त्रास वृद्ध, महिला, विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी, विशेषत: सावंतवाडी डेपोकरिता नवीन बसेस उपलब्ध करून प्रवाशांची गैरसोय टाळावी, अशी मागणी एसटी प्रवासी संघटना अध्यक्ष वसंत केसरकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यात गोवा राज्यातील कदंब परिवहन महामंडळाच्या बसेस वेंगुर्ले, कुडाळ, दोडामार्ग व सावंतवाडी आदी तालुक्यांच्या ठिकाणी प्रवाशांची वाहतूक करते. त्याच धर्तीवर गोवा राज्यातील पणजी, म्हापसा, साखळी, डिचोली या ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसेस सोडून महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने उचित कार्यवाही होणे आवश्यक आहे.
सावंतवाडी एसटी आगार हे कर्नाटक व गोवा या दोन्ही राज्यांसाठी केंद्रबिंदू आहे; मात्र आगाराची दयनीय अवस्था आहे. येथील इमारतीचे बांधकाम मागील ५ वर्षे सुरू असून, ज्या ठिकाणी प्रवासी थांबतात, ती इमारत कोणत्याही क्षणी कोसळून पडेल, अशी स्थिती आहे. या इमारतीचे बांधकाम त्वरित करण्याबाबत आदेश द्यावेत. सावंतवाडी बसस्थानकात नियमित आगार व्यवस्थापक नसल्याने प्रभारींकड़ून काम हाकले जात आहे. पूर्णवेळ व्यवस्थापक दिल्यास बहुतांश प्रश्न मार्गी लागतील. प्रवाशांना तिकीट देण्यासाठी असणाऱ्या मशिन अपुऱ्या असल्याने वाहकांचीच गैरसोय होत आहे. वाहने उशिराने मार्गस्थ होत असल्याने प्रवासी एसटी बसने प्रवास करणे टाळतात. त्यामुळे महामंडळाचा महसूल बुडतो. त्यामुळे इलेक्ट्रिक तिकिट मशिन उपलब्ध करून दिल्यास सोयीचे होईल. बांदा येथे वाहतूक नियंत्रण केंद्रात ध्वनीक्षेपकाची व्यवस्था करावी. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आवारातील खड्डे यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात. या सर्व प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर मार्गी लावावेत, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT