३५ (पान २ साठी)
डॉ. तानाजीराव चोरगे यांचा उद्या सत्कार
रत्नागिरी, ता. १८ ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांना राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट चेअरमन २०२२-२३ चा पुरस्कार मिळाल्याबद्दल रत्नागिरी तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्था, रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय येथे रविवारी (ता. २०) सकाळी १० वा. होणार आहे.
उत्कृष्ट चेअरमन पुरस्कार डॉ. चोरगे यांना दुसऱ्यांदा मिळाला आहे. त्यांनी रत्नागिरी जिल्हा बँकेला अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर काढून देशातील सर्वोत्कृष्ट जिल्हा बँक म्हणून नावारूपाला आणली आहे. त्यांची उत्कृष्ट प्रशासनशैली, सहकाराविषयीची तळमळ, राजकारणविरहित सहकार या सर्व बाबींमुळे जिल्हा बँकेची प्रगती झाली आहे. त्यांना मिळालेला हा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील सहकारामध्ये काम करणाऱ्या सर्वांना प्रेरणादायी आहे. ते नेहमीच सर्व सहकारात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी व्यक्तीमत्व राहिले आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे बँकेचे सर्व संचालक मंडळ तसेच बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सत्काराला उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी तालुक्यातील विकाससंस्था प्रतिनिधी गजानन पाटील यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.