कोकण

तेंडोलीत ‘आजीचा बटवा’ महोत्सव

CD

24220
तेंडोली ः येथील आजीचा बटवा महोत्सवाचे उद्‌घाटन करताना ज्येष्ठ उद्योजक बापू नाईक, अनघा तेंडोलकर, संजय नाईक, रश्मी कुडाळकर, मंगेश प्रभू आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

तेंडोलीत ‘आजीचा बटवा’ महोत्सव

ग्रामपंचायतीतर्फे आयोजन; २०० स्पर्धकांचा सहभाग

कुडाळ, ता. १८ ः तेंडोली केंद्र शाळा क्रमांक १ या ठिकाणी तेंडोली सेंद्रीय फार्मर प्रोड्युसर कंपनी, ग्रामपंचायत तेंडोली, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी व वनौषधी प्रदर्शन तसेच रानभाज्या पाककला स्पर्धा म्हणजेच ‘आजीचा बटवा तेंडोली महोत्सव’, या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात १७ बचतगट व १६ वैयक्तिक स्पर्धक म्हणजे जवळपास २०० स्पर्धक सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी तेंडोली सरपंच अनघा तेंडुलकर, तेंडोली गावचे उद्योजक सुरेश उर्फ बापू नाईक, रानभाज्या व वनौषधी यांचे अभ्यासक राजा शृंगारे, कुडाळ पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, उपसरपंच संदेश प्रभू, पोलिसपाटील संजय नाईक, सोसायटी चेअरमन विजय प्रभू, माजी सरपंच मंगेश प्रभू, केंद्र शाळा मुख्याध्यापिका सौ. खोत, मंडळ कृषी अधिकारी विजय घोंगे, कृषी पर्यवेक्षक श्रीमती कविटकर, ग्रामविकास अधिकारी आत्माराम परब, कृषी सहाय्यक रश्मी कुडाळकर, फार्मर प्रोडूसर कंपनीचे सर्व संचालक, तेंडोली गावातील सर्व महिला बचत गट, सेंद्रिय गटाचे सर्व पदाधिकारी, शेतकरी सभासद, तसेच तेंडोली गावातील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते. पाककला स्पर्धेसाठी राजा शृंगारे, विजय घोंगे व श्रीमती कविटकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यामध्ये बचतगट स्पर्धा विभागात १ ते ३ विजेते व २ उत्तेजनार्थ तसेच वैयक्तिक स्पर्धा विभागात १ ते ३ क्रमांक व उत्तेजनार्थ ३ क्रमांक निवडण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: गॅस सिलिंडर वेटिंग कमी झाली, तरी नागरिकांची अडचण कायम आहे; युद्धानंतर गॅस पुरवठा विस्कळीत; वेटिंग अजूनही हजारोंमध्ये

Chhatrapati Sambhajinagar: उन्हाच्या चटक्याने हवा प्रदूषणातही वाढ ; शहराचा एक्यूआय १४० च्या घरात; संवेदनशील गटांसाठी धोक्याची घंटा

Kairi Poha Recipe: काय? तुम्ही अजून 'कैरी पोहे' ट्राय नाही केले? जाणून घ्या अस्सल कोकणी चवीची सोपी रेसिपी

Chhatrapati Sambhajinagar: खर्चाचा भुर्दंड नागरिकांवर नको; पाण्याच्या मीटरचा ५१४ कोटींचा नव्याने प्रस्ताव

Trimbakeshwar VIP Darshan Scam: त्र्यंबकेश्‍वर देवस्थान विश्‍वस्त कडलगला अटक

SCROLL FOR NEXT