कोकण

-पावसमधील मनसे कार्यकर्ते ताब्यात आणि सुटका

CD

३३ (पान २ साठी)

पावसमधील मनसे कार्यकर्ते ताब्यात

तोडफोडीमुळे दक्षता ; शांततेचे आवाहन

पावस, ता. १८ ः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्धार मेळाव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राजापूर येथील हातिवले टोल नाका, पाली येथील कार्यालय फोडल्यानंतर कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी पावस परिसरातील मनसैनिकांना ताब्यात घेण्यात आले. काही काळानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वाहन चालकांना फार त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे. रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, रस्त्याचे काम अपूर्ण असताना टोल सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आल्यामुळे ते बंद करण्यासाठी मनसैनिकांनी टोल नाक्यांची तोडफोड केली. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरात शांतता निर्माण व्हावी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी पावस परिसरातील मनसैनिकांना शुक्रवारी (ता. १८) सकाळी दहा वाजता ताब्यात घेण्यात आले. त्यांना पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या वतीने योग्य त्या सूचना देऊन दुपारी अडीच वाजता त्यांना सोडण्यात आले. या संदर्भात पोलिस अंमलदार संदेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पावस परिसरामध्ये शांतता असताना त्याला गालबोट लागू नये यासाठी मनसैनिकांना परिसरामध्ये वातावरण बिघडू नये याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT