कोकण

गणेशोत्‍सवात अखंडित वीज पुरवा

CD

24237
कणकवली : जिल्‍हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे उपअभियंता विलास बगडे यांना निवेदन दिले.


गणेशोत्‍सवात अखंडित वीज पुरवा

कणकवलीत व्यापारी महासंघाची मागणी; महावितरणला निवेदन

कणकवली, ता.१८ : गणेशोत्‍सव कालावधीत जनतेला महावितरणकडून कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घ्या. तसेच गणपतीच्या अकरा दिवसांत वीज पुरवठा खंडित होऊ नये. त्‍यासाठीचे नियोजन आत्तापासूनच करा, अशी मागणी जिल्‍हा व्यापारी महासंघाने केली. याबाबतचे निवेदन महासंघाने महावितरणच्या अभियंत्‍यांना दिले.
जिल्‍हा व्यापारी महासंघाचे दीपक बेलवलकर, नंदन वेंगुर्लेकर, नितीन म्हापणकर, अशोक करंबेळकर, संतोष काकडे, राजेश राजाध्यक्ष, दादा कुलकर्णी, सुप्रिया पाटील आदींनी महावितरणचे उपअभियंता विलास बगडे यांची भेट घेतली. यावेळी गणेशोत्‍सव कालावधीत अखंडित वीज पुरवठा ठेवा याबाबत प्रामुख्याने मागणी करण्यात आली. तसेच खंडित होणाऱ्या वीज पुरवठा समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सहाय्यक कार्यकारी अभियंता राजेंद्र सुंत्यान, सहाय्यक अभियंता एस. पी. राणे, प्रवीण पंडित, अमोल थोरबोले, प्रगती परसगडे उपस्थित होते.
दरम्‍यान गणेशोत्‍सव कालावधीत अखंडित वीज पुरवठा देण्याबाबतच नियोजन सुरू आहे. ज्‍या काही समस्या असतील त्यांचा तातडीने निपटारा सुरू आहे, अशी ग्‍वाही उपअभियंता विलास बगडे यांनी दिली. गणेशोत्‍सवात अखंडित वीज पुरवण्यासाठी महावितरणने त्‍या त्‍या विभागातील लाईनमन आणि संबधित अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर प्रसिद्ध करावेत. जेणेकरून वीज समस्यांबाबत सामान्यांना तक्रारी मांडता येतील, अशी मागणी करण्यात आली.
---
नांदगाववासीय वीज समस्येने हैराण
नांदगाव येथील वीज ग्राहक दोन वर्षांपासून वीज समस्यामुळे हैराण झाले आहेत. यात त्‍या वीज ग्राहकांनी नांदगाव महावितरण कार्यालयाला टाळेही ठोकले, तरीही तेथील वीज समस्या का दूर झाल्‍या नाहीत? असा प्रश्‍न राजेश राजाध्यक्ष यांनी केला. यावर सहाय्यक अभियंता श्री. पंडित यांनी ३३ केव्ही पॉवरला बॅकअप नसल्याने वीजपुरवठा खंडित होत आहे, असे सांगितले. गेल्या वर्षी वीज ग्राहक मेळावा घेण्यात आला त्यामधील किती तक्रारी अजून प्रलंबित आहेत? असा प्रश्न नंदन वेंगुर्लेकर यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT