फोटो ओळी
-ratchl१८१.jpg- KOP२३M२४२२९
चिपळूण ः नाणीसंग्रहकांनी लोटिस्माला भेट देत प्राचीन नाणी संग्रहालयासाठी दिली.
-ratchl१८२.jpg-KOP२३M२४२३० कुशाण साम्राज्याचे नाणे.
दोन हजार वर्षापूर्वीचा नाण्याचा खजिना लोटिस्माच्या संग्रहालयात
संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात ; मौर्यकाल, सातवाहन काळातील नाण्यांचा समावेश
सकाळ वृत्तसे
चिपळूण, ता. १८ ः येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या संग्रहालयास दोन ते अडीच हजार वर्षापूर्वीच्या नाण्यांचा खजिना मिळाला आहे. इसवी सन पूर्व काळासह मोगल साम्राज्य आणि शिवकालीन नाण्यांचाही यात समावेश आहे. प्रत्येक शतकातील खास नाण्यांचा संग्रह करणाऱ्या महाराष्ट्रातील नाणीसंग्रहकांनी लोटिस्माचे वैभव वाढण्यासाठी ही नाणी भेट दिली आहेत. त्यामुळे आता कोकणात ज्यांच्या राजवटी झाल्या त्या काळातील नाणीसंग्रहाचे प्रयत्न लोटिस्माच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू ठेवले आहेत.
प्राचीन नाण्यांचा संग्रह करणारे महाराष्ट्रातील विनायक निजसुरे, गणेश नेणे, प्रशांत ठोसर, शैलेश मुळे, संदीप निजसुरे, गौरव लवेकर यांनी चिपळुणातील लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या संग्रहालयास ही प्राचीन नाणी भेट स्वरूपात दिली आहेत. मौर्यकाल, सातवाहन, कुशन, विश्नुकुंडी, वाकाटक, मुरूड-जंजिरा संस्थान अशी विविध कालखंडातील नाणी चिपळूणवासीयांना तसेच पर्यटकांना पाहता येणार आहेत.
अकबर गादीवर बसला तेव्हाचे मोगल साम्राज्य, दोन ते अडीच हजार वर्षापूर्वी इसवी सन पूर्वकाळ आणि शिवकालीन नाण्यांचा संग्रह लोटिस्माला मिळाला आहे. यात सहाव्या शतकातील वाकाटक, इसवी सन पूर्व कालातील चंद्रगुप्त मौर्य, मौर्य साम्राज्य ज्यांनी ब्राह्मी लिपीचा शोध लावला ते जेम्स प्रिन्सेप यांच्या काळातील कुशाण या नाण्यांचाही समावेश आहे. जंजिराच्या सिद्दी इब्राहिम खान यांच्या काळातीलदेखील नाणे आता संग्रहित झाले आहे. त्यामुळे आता लोटिस्मात शिवकालीन ते पेशवाईपर्यंतच्या दुर्मिळ नाण्यांचा खजिना येथे उपलब्ध झाला आहे. कदंब, पोर्तुगीज यांच्यासह ज्यांची कोकणात राजवट होती त्यांच्या राजवटीतील नाणी संग्रहित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संग्रहकांनी दुर्मिळ नाणी संग्रहालयात सुपूर्द करताना संग्रहालयातील वस्तू तसेच नाणी पाहून समाधान व्यक्त केले. संस्थेने साकारलेल्या कलादालनातील तैलचित्रांची माहिती घेऊन यापुढे आम्ही ग्रंथालयाच्या संग्रहालयाला सर्व मदत करणार असल्याचे नाणी संग्रहकांनी सांगितले. कोकणात इतके भरीव कार्य करणारी लोटिस्मा संस्था अभिमानास्पद असल्याचेही संग्रहकांनी सांगितले. ग्रंथालयाचे कार्यवाह विनायक ओक यांनी सर्वांना चिपळूण १९४२ हे पुस्तक भेट दिले. संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच संग्रहालय पुन्हा सुरू होणार असल्याचे ओक यांनी या वेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.