कोकण

ःदापोलीत चोरटे सक्रीय

CD

३८ (पान ३ साठी)

दापोलीतील तीन बंद घरे फोडली

चोरटे सक्रीय; रोकड, दागिन्यांवर डल्ला, एकास ताब्यात

दाभोळ, ता. १८ ः दापोली शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तीन बंद घराचे कडीकोयंडे उचकटून रोकड व दागिन्यांवर डल्ला मारल्याच्या तक्रारी दापोली पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. यापैकी दोन घरफोडींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
दापोली शहरातील प्रभू आळी येथे राहणारे निवृत्त बँक अधिकारी शेखर प्रधान हे त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून १२ ऑगस्टला नातेवाइकांकडे गेले होते. १६ ऑगस्टला सकाळी शेजारी राहणारे पिसे यांनी त्यांना फोन करून सांगितले की, तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे. तेव्हा प्रधान यांनी त्यांना घरात जाऊन बघण्यास सांगितले. त्यांना घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असून घरातील कपाटही उघडे दिसले. त्यांनी याची माहिती प्रधान यांना दिली. दापोली येथे आल्यावर त्यांनी घरात जाऊन पहिले असता त्यांना घराच्या मुख्य दरवाजाच्या कडीकोयंडा उचकटून टाकलेला दिसला. कपाटही उघडे होते. कपाटाच्या लॉकरमधील रोख ८० हजार रुपये व ७६ रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिली आहे.
दापोली शहरातील भारतनगर येथील महेक अवेन्यू या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या फराह टेटवलर या १२ ऑगस्टला घराच्या दरवाजाला कुलूप लावून टेटवली येथे गेल्या होत्या. १६ ऑगस्टला त्या परत आल्यावर त्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप काढले; मात्र दरवाजा उघडत नसल्याने गॅलरीमधील खिडकी उघडून आत जाऊन घराचा दरवाजा उघडला. घरातील कपाटाचे लॉकर तोडून अज्ञात चोरट्याने त्यातील ३ हजार ४०० रुपये किमतीचे दागिने चोरले असल्याची तक्रार त्यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
दापोली शहरातील कोंबडीगल्ली येथे राहणाऱ्या परविन काझी या १२ ऑगस्टला पवई ( मुंबई) येथे घराच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. १६ ऑगस्टला सकाळी त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना घराचा दरवाजा तुटलेला असल्याचे सांगितल्यावर त्या १७ ऑगस्टला दापोली येथे परतल्या. त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा अज्ञात चोरट्याने उचकटून टाकून घरातील लोखंडी कपाट उघडून त्यातील रोख रुपये १० हजार व ५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कुड्या चोरल्याची तक्रार त्यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. दापोली पोलिस अधिक तपास करत आहेत.

दोन घडफोड्याचा छडा...
शहरात झालेल्या ३ घरफोड्यापैकी दोन घरफोंडीचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका संशयिताला दापोली पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एका घरफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT