संशयास्पद फिरणारे दोघे ताब्यात
सावंतवाडी ः कोलगाव नाक्याजवळ असलेल्या दुध डेअरीच्या मागे संशयास्पद फिरणाऱ्या दोघा युवकांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोघांचीही पोलिसांनी चौकशी केल्यावर अल्पवयीन युवकाला समज देऊन सोडून दिले तर दुसऱ्यावर प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली. चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा ग्रामस्थांचा संशय आहे. त्यातील एकजण नटबोल्ट विकून दुचाकीमध्ये पेट्रोल भरणार होता, असे त्याने पोलिस चौकशीत सांगितले आहे, असे पोलिस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांनी सांगितले. या प्रकरणी हवालदार श्री. राऊत यांनी कोलगाव येथे दोघांनीही ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक अधिकारी यांच्याकडे आणले. नंतर याप्रकरणी चौकशी करून प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
----------------
तरुणावरील ‘तो’ हल्ला मद्याच्या नशेत
सावंतवाडी ः शहरातील मोती तलावावर काल एका तरुणावर झालेला तो हल्ला मद्यधुंद अवस्थेत करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. शिरसाट असे जखमीचे नाव असल्याचे समजते; मात्र, अद्याप तो शुद्धीवर आला नसल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. शुद्धीवर आल्यानंतर दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ला करणाऱ्या त्या दोघांचा शोध सुरू असून जखमीवर जिल्हा रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत, अशी माहिती येथील पोलिस निरिक्षक ऋषीकेश देसाई यांनी दिली.
--
कणकवलीत एकावर विनयभंगाचा गुन्हा
कणकवली ः महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे मेसेज पाठविल्याप्रकरणी हरकुळ बुद्रुक गावठणवाडी येथील एकावर गुन्हा दाखल झाला. यासीनखान बाबाखान पठाण (वय ६६), असे संशयिताचे नाव आहे. संबंधित महिलेच्या फिर्यादीनुसार येथील पोलिस हा गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार २७ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान घडला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पाटील करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.